Adipurush | ‘त्याबाबतीत सैफचा गैरसमज झाला’, वादग्रस्त वक्तव्यावर ‘आदिपुरुष’च्या लेखकाची प्रतिक्रिया…

‘बाहुबली’ प्रभास आणि अभिनेता सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ सध्या बराच चर्चेत आहे.

Adipurush | ‘त्याबाबतीत सैफचा गैरसमज झाला’, वादग्रस्त वक्तव्यावर ‘आदिपुरुष’च्या लेखकाची प्रतिक्रिया...
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 12:23 PM

मुंबई : ‘बाहुबली’ प्रभास आणि सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ सध्या बराच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सैफ अली खानने या चित्रपटाच्या अनुषंगाने एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. सैफच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याला अनेक टीकांना सामोरे जावे लागले होते. यानंतर त्याने माफी मागत आपले वक्तव्य मागे घेतले होते. यानंतर आता ‘आदिपुरुष’च्या लेखकाने या संदर्भात वक्तव्य केले आहे (Adipurush film write manoj muntashir reaction on saif ali khan’s controversial statement).

याबाबतीत ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे लेखक मनोज मुंटशीर यांचे विधान समोर आले आहे. या चित्रपटात असे काहीही आक्षेपार्ह नाही, ज्यामुळे लोकांना वाईट वाटेल, असे त्याने म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, यात सैफ अली खानचा काहीतरी गैरसमज झाला आहे. ‘मिड डे’बरोबर झालेल्या संभाषणादरम्यान मनोज म्हणाले की, ‘रावणातील प्रत्येक पैलू या चित्रपटात दाखवला जाईल. तो एक राजा म्हणून कसा होता हे चित्रित केले जाईल. रावणाचा असा विश्वास होता की, तो रामापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे.’

सैफ अली खानविषयी बोलताना ते म्हणाले की, सैफ आपल्या व्यक्तिरेखाला उत्तमप्रकारे निभावतो. त्याला समजून घेण्याच्या दृष्टीने तो प्रश्नही विचारतो.

नेमकं प्रकरण काय?

‘आदिपुरुष’ हा भगवान राम यांच्यावर बनलेला चित्रपट आहे. सैफ अली खान 2022 साली प्रदर्शित होणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट रामायणावर आधारीत आहे. दरम्यान, ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत सैफने सीताहरण संबंधित केलेल्या टिप्पणीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता (Adipurush film write manoj muntashir reaction on saif ali khan’s controversial statement).

सैफने सीताहरणबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर प्रचंड भडका उडाला. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी त्याला या चित्रपटातून बाहेर काढण्याची मागणी केली. त्याचबरोबर चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागली. त्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी देखील इशारा दिला. या सर्व घडामोडीनंतर सैफने आपल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे. ‘व्हायरल भयानी’ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सैफची भूमिका शेअर केली आहे. मला कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असं सैफ म्हणाला आहे.

सैफ वादग्रस्त वक्तव्य काय?

“एका राक्षस राजाची भूमिका साकारणं हे खूप उत्साहिक आहे. मात्र ही भूमिका तितकी क्रूर नाही. आम्ही या भूमिकेला भरपूर मनोरंजनात्मक पद्धतीने सादर करणार आहोत. सीतेचं अपहरण आणि रामासोबत झालेलं युद्ध आम्ही दाखवणार आहोत. लक्ष्मणाने रावणाची बहिण शूर्पणखाचं नाक कापलं होतं. त्याचाच सूड उगवण्यासाठी सीतेचं अपहरण करण्यात आलं आणि रामासोबत युद्ध झालं, असं आम्ही दाखवणार आहोत”, असं वक्तव्य सैफ अली खानने केलं आहे.

(Adipurush film write manoj muntashir reaction on saif ali khan’s controversial statement)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.