AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adipurush | वादानंतर ओम राऊतचं सावध पाऊल; ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरमध्ये ‘लंकेश’बाबत घेतला हा निर्णय

“त्या पाच – सहा महिन्यांचा कालावधी मिळणे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आम्ही अशा तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे जो मार्व्हल, डीसी, अवतार यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवला गेला”, असं ओम राऊत म्हणाला.

Adipurush | वादानंतर ओम राऊतचं सावध पाऊल; 'आदिपुरुष'च्या ट्रेलरमध्ये 'लंकेश'बाबत घेतला हा निर्णय
Saif Ali Khan in Adipurush (1)Image Credit source: Youtube
| Updated on: May 09, 2023 | 3:32 PM
Share

मुंबई : ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. यामध्ये प्रभासने राम, क्रिती सनॉनने सीता आणि सैफ अली खानने लंकेश रावणाची भूमिका साकारली आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. मात्र व्हिएफएक्स आणि कलाकारांच्या लूकवरून नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं. आता ट्रेलरमध्ये दिग्दर्शक ओम राऊतने सावध पाऊल उचलल्याचं पहायला मिळत आहे.

ट्रेलरमधील व्हीएफएक्समध्ये बरेच सुधार दिसत आहेत. त्याचसोबत कलाकारांच्या लूकमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरची सुरुवात हनुमानाच्या दृश्याने होते. त्यानंतर सुरू होते रामायणाची कथा. मात्र या ट्रेलरमध्ये लंकेशच्या भूमिकेबाबत सावध पाऊल उचलण्यात आलं आहे. साधूच्या वेशातील रावणाची एक झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. त्यानंतर थेट शेवटी काही सेकंदांसाठी सैफ अली खानचा लूक पहायला मिळतो. मात्र ट्रेलरमध्ये लंकेशचा पूर्ण लूक दिसू नये, याची काळजी दिग्दर्शकांनी पुरेपूर घेतल्याची दिसतेय.

पहा ट्रेलर

या बिग बजेट चित्रपटातील व्हीएफएक्सवर प्रेक्षकांनी जोरदार टीका केली होती. या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला होता. देशभरातून तीव्र विरोध झाल्यानंतर अखेर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आणि चित्रपटात अपेक्षित बदल करण्याचा निर्णय घेतला. ‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांचे लूक पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. टीझरमधील रावणाच्या लूकवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. सैफ अली खानच्या दाढीची तुलना नेटकऱ्यांनी मुघलांशी केली होती. हा वाद नंतर इतका वाढला की निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली.

“त्या पाच – सहा महिन्यांचा कालावधी मिळणे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आव्हानं प्रत्येक गोष्टीत असतात. पण ही आव्हानं आमच्या चित्रपटाला अधिक चांगला आणि मजबूत बनवेल. आम्ही अशा तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे जो मार्व्हल, डीसी, अवतार यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवला गेला”, असं ओम राऊत म्हणाला.

या चित्रपटाच्या ट्रेलरवर अनेकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. रामाच्या भूमिकेतील प्रभासचं तोंडभरून कौतुक होत आहे. ‘बाहुबली’प्रमाणेच त्याचा हा चित्रपटसुद्धा ब्लॉकबस्टर होईल असं चाहते म्हणत आहेत. तर व्हिएफएक्समध्ये केलेला सुधार नेटकऱ्यांना आवडला आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....