Indian Idol 12 | पवनदीप-अरुणिता खरंच एकमेकांच्या प्रेमात पडलेयत? पाहा आदित्य नारायण काय म्हणाला…

‘इंडियन आयडॉल 12’मध्ये सध्या स्पर्धक पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) यांच्या प्रेमकथेची चर्चा सुरू आहे. प्रत्येक भागामध्ये दोघांबद्दल काहीना काही चर्चा केली जाते किंवा ते दोघे एकत्र सादरीकरण करतात.

Indian Idol 12 | पवनदीप-अरुणिता खरंच एकमेकांच्या प्रेमात पडलेयत? पाहा आदित्य नारायण काय म्हणाला...
पवनदीप आणि अरुणिता

मुंबई : ‘इंडियन आयडॉल 12’मध्ये सध्या स्पर्धक पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) यांच्या प्रेमकथेची चर्चा सुरू आहे. प्रत्येक भागामध्ये दोघांबद्दल काहीना काही चर्चा केली जाते किंवा ते दोघे एकत्र सादरीकरण करतात. याशिवाय चॅनलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या दोघांचे व्हिडीओही शेअर केले जातात, ज्यामुळे त्यांच्या नात्याच्या बातम्याही चर्चेत आल्या आहेत. मात्र, आता शोचा होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) याला याबद्दल विचारले असता, त्याने या मागचे संपूर्ण सत्य सांगितले (Aditya Narayan reacted on Pawandeep Rajan and Arunita Kanjilal lovestory).

आदित्य म्हणाला, दोघेही रिलेशनशिपमध्ये नाहीत. मात्र, दोघेही कधीही याला नकार देत नाहीत आणि हा एक चांगला विनोद आहे. याशिवाय प्रेक्षकांनी स्पर्धकांवर, त्यांच्या सादरीकरणावर आणि कार्यक्रमाच्या वास्तवावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे आदित्य म्हणाला. आम्ही सर्व शोचे महत्त्वाचे भाग आहोत. आम्ही या कार्यक्रमाचे प्रदर्शन नेहमीच मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न करतो.

ही तर कार्यक्रमाची रणनीती!

आदित्य पुढे म्हणाला की, ही सर्व एक रणनीती आहे. कारण जर कार्यक्रम 90 मिनिटांचा असेल, तर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तुम्हाला हे सर्व करावे लागते. पवनदीप आणि अरुणिता यांना सतत या गोष्टीवर छेडले जाते. कदाचित भविष्यात या दोघांमध्ये असे काही घडले काय माहित आणि तसे न झाल्यासही कदाचित ते पुढे जातील, मूव्ह ऑन करतील असेही ते म्हणाले. आता ते केवळ कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत (Aditya Narayan reacted on Pawandeep Rajan and Arunita Kanjilal lovestory).

यावेळी आदित्यने आपल्या आणि नेहा कक्कर यांच्या लिंक अपच्या वृत्ताचे उदाहरण दिले. तो म्हणाला, लोकांना वाईट देखील वाटू लागले होते, कारण ते आपल्याला त्यांच्या घरातील सदस्य मानतात. यानंतर आदित्यने डेली सोपचे आणखी एक उदाहरण दिले आणि तो म्हणाला, लोकांना माहित आहे की, कट म्हटल्यावर सगळेच कलाकार त्यांच्या खऱ्या जोडीदारांकडे जातात. मग रियलिटी शोबद्दलच इतका गोंधळ का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

आदित्यने अचानक लग्न केल्याचे कारण…

अचानक गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न का केले?, या प्रश्नाचे उत्तर आदित्यने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तो म्हणाले होते, ‘कोरोनाने आमच्या लग्नाच्या प्रक्रियेला गती दिली. वास्तविक, मागच्या लॉकडाऊनमध्ये माझ्या आणि श्वेतामध्ये बर्‍याच छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद झाले, कारण आम्ही एकमेकांना मिस करत होतो. श्वेताचे घर आता जिथे आम्ही राहतो त्यापासून अर्धा किलोमीटर दूर होते. परंतु लॉकडाऊनमुळे आम्ही एकमेकांना भेटू शकत नव्हतो. यामुळे मला खूप त्रास व्हायचा. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांनी नेहमी आपल्याबरोबर रहावे, अशी आपली इच्छा असते. याच कारणामुळे आम्ही घाईने लग्न केले आणि एकमेकांसोबत राहू लागलो.’

(Aditya Narayan reacted on Pawandeep Rajan and Arunita Kanjilal lovestory)

हेही वाचा :

कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन

‘हवा हवाई’ गाताना कविता कृष्णमूर्तींकडून झाली होती चूक, जाणून घ्या या गाण्याचा किस्सा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI