AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India’s Got Latent : समयच्या शोमध्ये पाकिस्तानी हेरावरून जोक, अदनान सामीचा भन्नाट रिप्लाय

'इंडियाज गॉट लॅटेंट' च्या सेटवर आयुष्मान खुराणाच्या 'उडता तीर' मधील पाकिस्तानी गुप्तहेराच्या भूमिकेची अदनान सामीशी तुलना करण्यात आली. या विनोदाने एकच हशा पिकला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अदनान सामीने स्वतः मजेशीर प्रतिक्रिया दिली.

India’s Got Latent : समयच्या शोमध्ये पाकिस्तानी हेरावरून जोक, अदनान सामीचा भन्नाट रिप्लाय
| Updated on: Sep 28, 2026 | 8:20 PM
Share

‘इंडियाज गॉट लॅटेंट’ (India’s Got Latent ) च्या पहिल्या सीझनप्रमाणेच याचा दुसराही सीझन चर्चेत आहे. त्यातील काही भागांतील विधानावरून शो, कधी त्यातील स्पर्धक तर कधी खुद्द समय रैना.. हे सगळे वादात सापडले. आता सध्या हा शो पुन्हा चर्चेत आला आहे. ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ च्या नुकत्याच आलेल्या भागात अभिनेता आयुष्मान खुराना हा सहभागी झाला होता. ‘उड़ता तीर’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तो समय रैनाच्या शोमध्ये आला. हा चित्रपट आणि त्यातील भूमिकेसंदर्भात तो बोलला. ‘उडता तीर’ या चित्रपटाबाबत चर्चा सुरू असताना त्याच्या पाकिस्तानी गुप्तहेराच्या भूमिकेचा उल्लेख करण्यात आला आणि त्याचवेळी गायक अदनान सामीचंही नाव घेण्यात आलं आणि एकच हशा पिकला. मात्र आता यावर खुद्द गायकानेच कमेंट केली असून ती इंटनेरवर वेगाने व्हायरल झाली आहे.

खरंतर, आयुष्मान खुराना, कॉमेडियन कुल्लू, रजत सूद आणि मेंटलिस्ट सुहानी शाह हे पॅनलिस्ट म्हणून या शोमध्ये आले होते. या एपिसोडचा व्हिडीओ इंटरनेटवर बराच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आयुष्मान खुराना याला त्याच्या आगामी ‘उड़ता तीर’ या चित्रपटाबद्दल काही विचारण्यात आलं.

काय म्हणाला आयुष्मान खुराना ?

आपल्या या चित्रपटाबद्दल आयुष्मान भरभरून बोलला. ‘ हा भारतातला पहिला देशभक्तीपर कॉमेडी आणि स्पाय-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात मी पाकिस्तानी गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. तो ( गुप्तहेर) भारतात येतो आणि एका अपघातानंतर त्याची स्मरणशक्ती जाते. आपण भारतीय आहोत, असं त्याला वाटू लागतं. देशभक्ती तर त्याच्या लक्षात राहते, पण तो कोणत्या देशाचा रहिवासी आहे, हे तो विसरतो.’ असं आयुष्मानने सांगितलं.

मात्र त्याचं हे बोलणं ऐकल्यावर कुल्लू म्हणाला, ‘ ( म्हणजे) तो तर अदनान सामी आहे ‘ त्याचं हे बोलणं ऐकल्यावर तिथे उपस्थित असलेले सगळे लोकं हसू लागले.आता हा व्हिडीओ इंटरेनवर आला असून तो व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे गायक अदनान सामीने त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

अदनान सामी काय म्हणाला ?

यावर अदनान सामी यानेही कमेंट केली. “आधी माझ्याकडून ‘राइट्स’ घ्या आणि मग चित्रपट बनवा!!!” असं त्याने मजेशीर अंदाजात लिहिलं. त्याची ही कमेंट अनेकांना आवडली असून कित्येकांना हसू फुटलं.

गायक अदनान सामीला 2016 साली भारतीय नागरिकत्व मिळालं. यापूर्वी तो पाकिस्तानी नागरिक होता आणि त्याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट होता.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...