
बहुचर्चित बॉर्डर 2 सिनेमा अखेर थिएटरमध्ये आज रिलीज झाला आहे. 1997 साली आलेल्या बॉर्डर सिनेमाचा हा दुसरा भाग आहे. 1971 भारत-पाकिस्तान युद्धाचा थरार या सिनेमातून मांडण्यात आला आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची सिने रसिकांमध्ये चर्चा सुरु होती. हा चित्रपट पाहण्यासाठी फक्त भारतीयचं नाही, तर अफगाणिस्तानात सुद्धा अनेकजण आतुर आहेत. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार राशिद खानने बॉर्डर 2 सिनेमा पाहण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यावर अभिनेता सनी देओल, सुनील शेट्टी, वरुण धवन आणि अहान शेट्टी रिएक्ट झाले आहेत. सध्या अफगाणिस्तान-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिकेसाठी राशिद खान दुबईमध्ये आहे. तिथून त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये राशिद खान रस्त्याच्या कडेला उभा असलेला दिसतोय. कोळ्शावर कणीस भाजत आहे. त्याच्यामागे बॉर्डर 2 मधील घर कब आओगे गाण्याची म्युझिक सुरु आहे. त्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे. थम्स अपची साइन त्याने व्हिडिओमध्ये केली आहे. ही क्लिप शेअर करताना त्याने ‘बॉर्डर 2 मी जरुर बघणार. पण हे पोस्ट केल्यावर काय होतं ते पाहू’ असं म्हणत त्याने या मूव्हीच्या आघाडीच्या अभिनेत्यांना आपल्या पोस्टमध्ये टॅग केलं आहे.
…तर मी बॉर्डर 2 दोनवेळा पाहीन
राशिद खानच्या या पोस्टवर बॉर्डर 2 सिनेमाच्या आघाडीच्या चारही अभिनेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वरुण धवनने लिहिलय ‘हा भाई’. अहान शेट्टी ‘लॉट्स ऑफ लव्ह भाई’, सुनील शेट्टीने ‘ये हुई ना बात’ अशा कमेंट केल्या आहेत. सनी देओलने पोस्ट लाइक केली आहे. सुनील शेट्टीचा जावई केएल राहुलने मेहुणा अहानला सपोर्ट केलाय. केएल राहुलने क्रिकेट फिल्डवर प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात त्याने लिहिलय की, “जर अहान शेट्टीने या व्हिडिओवर कमेंट केली, तर मी बॉर्डर 2 दोनवेळा पाहीन. आवाज पोहोचला पाहिजे” अनुराग सिंहने बॉर्डर 2 सिनेमाचं दिग्दर्शन केलय.