अपघातानंतर महिमा चौधरीचा चेहरा विद्रूप झाला होता; अनेक चित्रपट गमवावे लागले
अभिनेत्री महिमा चौधरी 90 च्या दशकातील प्रसिद्ध अन् लोकप्रिय अभिनेत्री. पण एका चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी तिचा कार अपघात झाला होता. त्या अपघातानंतर तिचं आयुष्यच बदललं. या अपघातानंतर तिचा चेहरा विद्रूप झाला होता. ज्यामुळे तिला अनेक चित्रपट गमवावे लागले आणि करिअरमध्ये मोठे चढ-उतार आले. तिने याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं.

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. महिमा चौधरी ही 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. तिचे “परदेस”, “दिल क्या करे” आणि “धडकन” हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. तथापि, अचानक एका अपघाताने ती प्रसिद्धीच्या झोतात आली. पण तिच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की ज्यामुळे तिचे फक्त करिअरच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्येही मोठा बदल झाला. त्यानंतर ती बॉलिवूडमधून जशी गायबच झाली. महिना चौधरी आता नव्या चित्रपटात दिसणार आहे. ती संजय मिश्रा यांच्यासोबत “दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी” या चित्रपटात दिसणार आहे. पण तिने तिच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे आणि आता ती मोठ्या पडद्यावर पुन्हा परतली आहे.
महिमा चौधरीचे संघर्षमय जीवन
1999 मध्ये आलेल्या “दिल क्या करे” या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान महिमाचा कार अपघात झाला होता आणि ती गंभीर जखमी झाली. तिच्या शरीरात काचेचे 67 तुकडे घुसले होते, जे शस्त्रक्रियेद्वारे काढावे लागले. त्यानंतर मात्र महिमाचे जीवन फार अवघड बनलं. तिचे पहिले लग्न देखील तुटले होते. त्यानंतर महिमाला स्तनाचा कर्करोग झाला होता. ज्यातून ती आता बरी झाली आहे.
चित्रपटात काम मिळत नव्हते
एका मुलाखतीत महिमा चौधरीने अपघातानंतर तिच्या आयुष्यात आलेल्या अडचणींबद्दल उघडपणे सांगितले आहे. महिमाने सांगितले की, “माझ्या पहिल्या चित्रपटानंतर मला न्यायालयात खेचण्यात आले. मला अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात देखील आले कारण लोकांनी दावा केला होता की मी मुक्ता आर्ट्ससोबत करारबद्ध आहे, जे पूर्णपणे खोटे होते. नंतर माझा एक अपघात झाला आणि त्यानंतर मी एक वर्ष घरीच होते.”
महिमा पुढे म्हणाले, “मी छोट्या भूमिका करू लागलो आणि ते सर्व चित्रपट हिट झाले, जरी मी फक्त एक गाणे केले तरी. नंतर मला फक्त एका गाण्यासाठी ऑफर येऊ लागल्या.पण मी नकार दिला. सगळे मला लकी मस्कट म्हटले जाऊ लागले. पण मला आणखी काम करायचे होते. त्यानंतर मला प्रियदर्शन, राज कुमार संतोषी, लज्जा इत्यादी चित्रपट केले.”
View this post on Instagram
कार अपघातानंतर आयुष्य बदललं
महिमाने तिच्या कार अपघाताबद्दल पुढे सांगितले. तिने स्पष्ट केले की तो तिच्यासाठी खूप कठीण क्षण होता. तिचा चेहरा पूर्णपणे बदलला होता, ज्यामुळे तिला त्रास होत होता. अभिनेत्री म्हणाली, “माझ्या चेहऱ्यावर काचेचे 67 छोटे तुकडे होते. जे नंतर काढून टाकले गेले. पण दुसऱ्या दिवशी, माझा चेहरा आणखी सुजला आणि माझा चेहरा विद्रूप झाला. माझ्या चेहऱ्यावरील जखमांवर माझे मित्र हसत असायचे, त्यांना वाटायचे की माझे कोणाशी तरी भांडण झाले आहे आणि मी खोटे बोलत आहे. त्यावेळी, मला पुढे काय करावे याची कल्पना नव्हती. तो खूप कठीण काळ होता.”
“मी उन्हात बाहेर जाऊ शकत नव्हते.”
पुढे ती म्हणाली “मी उन्हात बाहेर जाऊ शकत नव्हते. मला टाके पडले होते, त्यामुळे ते बरे होण्याची वाट पाहावी लागत होती. जास्त किरणांपासून व्रण पडण्याची भीती वाटत होती. त्याच दरम्यान, मी उरलेली 2 गाणी पूर्ण केली, पण बाहेर जाऊन काम करण्याची परवानगी नव्हती. माझा पोशाख डिझायनर टाके आणि व्रणांवर, विशेषतः डाव्या बाजूला, चमकदार हिऱ्यासारखे डॉट लावत असे, जिथे चेहऱ्यावर जास्त सूज होती त्याठिकाणी थोडा जास्त मेकअप केला जायचा. त्यानंतर, ते एक फॅशन बनले”
महिमा या वर्षी, 2025 मध्ये आणखी दोन चित्रपटांमध्ये दिसली आहे. एक कंगना राणौतचा “इमर्जन्सी” आणि दुसरा इब्राहिम अली खान आणि खुशी कपूरचा “नादानियां”मध्ये. एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तर दुसरा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तथापि, दोन्ही चित्रपटांना लक्षणीय प्रतिसाद मिळाला नाही.
