AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Emergency : ‘इमर्जन्सी’ चित्रपटावरुन कंगना राणौतला मुंबई हायकोर्टाने दिला झटका

Emergency : खासदार, अभिनेत्री कंगना राणौत 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. कंगना रणौत नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे लक्ष वेधून घेते. कंगना राणौतचा बहुचर्चित 'इमर्जन्सी' चित्रपट कधी प्रदर्शित होणार? असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

Emergency : 'इमर्जन्सी' चित्रपटावरुन कंगना राणौतला मुंबई हायकोर्टाने दिला झटका
emergency
| Updated on: Sep 04, 2024 | 4:22 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाला सेंसर सर्टिफिकेट मिळावं म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. 6 सप्टेंबरला चित्रपट रिलीज करता यावा, यासाठी हे पाऊल उचललं होतं. पण मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाला सीबीएफसी सर्टिफिकेट देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.

या प्रकरणी इतक्या लवकर आदेश देता येणार नाही असं कोर्टाने म्हटलय. या प्रकरणी 18 सप्टेंबरपर्यंत निर्णय होईल. म्हणजे 19 सप्टेंबरला कोर्टात सुनावणी होईल. त्याशिवाय CBFC ला सुद्धा कोर्टाने फटकारलय. चित्रपटांवर कोट्यवधी रुपये लागलेले असतात. गणपती उत्सवाच्या सुट्टीच कारण देऊन सर्टिफिकेट संबंधीच्या विषयावरुन CBFC ला पळ काढता येणार नाही असं कोर्टाने म्हटलय.

कोर्टाने काय म्हटलं?

जी एंटरटेनमेंट या प्रकरणात याचिकाकर्ता आहे. फिल्ममध्ये ते सहनिर्माता आहेत. त्यांच्यावतीने कोर्टात वरिष्ठ अधिवक्ता वेंकटेश धोंड हजर झाले. केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाकडून (सीबीएफसी) अधिवक्ता अभिनव चंद्रचूड हजर झाले. कोर्टाने सेंसर बोर्डाला निर्देश दिले की, चित्रपटासंबंधी जे आक्षेप आहेत, त्यावर विचार करा आणि 18 सप्टेंबरपर्यंत प्रमाणपत्र जारी करा. कोर्टाच्या या आदेशानंतर चित्रपट आता 6 सप्टेंबरला रिलीज होणार नाही. प्रदर्शन दोन आठवड्यांसाठी टळलं आहे.

याचिकेत काय म्हटलेलं?

जी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेजने चित्रपट ठरलेल्या तारखेला रिलीज करण्याची मागणी करताना मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात इमर्जन्सी चित्रपटाला प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश देण्याची विनंती होती. सेंसर बोर्डाकडे प्रमाणपत्र तयार आहे. पण कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रमाणपत्र रिलीज करण्यात येत नाहीय असं याचिकेत म्हटलं आहे.

Follow Us
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?