
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची माहिती समोर येताच सर्वांनाच धक्का बसला आहे. आरोपींनी किती क्रूर आणि अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली याचे फोटो आणि व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत. ते पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याने देखील संताप व्यक्त केला आहे. त्याने ‘मन सुन्न करणारे फोटो’ असे म्हटले आहे.
आरोपींनी संतोष देशमुख यांची अमानवी कृत्य करून हत्या केल्याचे समोर येताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात काम करणारा अभिनेता पृथ्विक प्रतापने संताप व्यक्त केला आहे. त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ‘मन सुन्न करणारे, मन हेलावून टाकणारे, संतापजनक फोटो… संतोष देशमुख यांना न्या मिळायलाच हवा’ अशी पोस्ट त्याने केली आहे.
post
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओसमोर आल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींना सर्व मानवी संवेदना सोडल्या होत्या. त्यांनी क्रूरपणाचा कळस गाठला होता. संतोष देशमुख यांचे कपडे काढून त्यांना विवस्त्र करुन मारहाण केली होती. त्यांच्या चेहऱ्यावर एकाने लघगी केली तर जनावराच्या चामडीसारखी पाठ सोलून काढली होती. दरम्यान, आरोपींनी ग्रुपवर व्हिडिओ कॉल देखील केला होता. व्हिडीओ कॉल करणारा आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. या हत्येचे १५ व्हिडीओ आणि ८ फोटो पोलिसांना मिळाले. तसेच या हत्ये मागे मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचे समोर आले आहे.