‘मी अमिताभ बच्चन यांचा वारसा पुढे नेणार नाही’, अगस्त्य नंदाचा मोठा निर्णय, म्हणाला- ‘माझं आडनाव…’
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा सध्या त्याच्या आगामी 'इक्कीस' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अशातच त्याने बच्चन कुटुंबासंदर्भात मोठं विधान केलं आहे.
जरी अगस्त्य नंदाचे आई-वडील हे इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नसले तरी त्याचे इतर नातेवाईक हे इंडस्ट्रीमध्ये आहेत.
गेल्या अनेक दिवसांमध्ये अनेक नवीन कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव म्हणजे अगस्त्य नंदा.
जरी अगस्त्य नंदाचे आई-वडील हे इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नसले तरी त्याचे इतर नातेवाईक हे इंडस्ट्रीमध्ये आहेत.
कारण, अगस्त्य नंदा हा बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये बच्चन कुटुंब हे प्रचंड सक्रिय आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन यांचा मुलगा हा अगस्त्य आहे. श्वेता बच्चन यांच्या नवऱ्याचे नाव निखील नंदा आहे.
अशातच त्याला आयएमडीबीशी संवाद साधताना विचारण्यात आलं की, तू बच्चन कुटुंबातून असल्याने लोकांना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. तर त्याचं ओझं तुला जाणवतं का?
त्यावर त्याने अमिताभ बच्चन यांचा वारसा पुढे नेणार नाही असं म्हटलं. पुढे तो म्हणाला की, ‘मला दडपण जाणवत नाही, कारण तो माझा वारसा नाही असं मला वाटतं’.
माझं आडनाव नंदा आहे. मी आधी वडिलांचा. त्यामुळे त्यांना अभिमान वाटेल असं काम करण्याचा मी प्रयत्न करणार असं तो म्हणाला.