AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aggabai Sasubai | शुभ्रा सोहमच्या हातून मंगळसूत्र घालून घेणार? आसावरीला सत्य कळणार! 

मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद तर मिळतो आहेच, पण प्रेक्षक ‘आसावरी, अभिजित, शुभ्रा आणि बबड्या’ या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत.

Aggabai Sasubai | शुभ्रा सोहमच्या हातून मंगळसूत्र घालून घेणार? आसावरीला सत्य कळणार! 
| Updated on: Oct 13, 2020 | 6:55 PM
Share

मुंबई : ‘अग्गबाई सासूबाई’ मालिका सध्या रंजक वळणार पोहोचली आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरले आहे. मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद तर मिळतो आहेच, पण प्रेक्षक ‘आसावरी, अभिजित, शुभ्रा आणि बबड्या’ या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत. या मालिकेतील कलाकारांवर येणारे ‘मिम्स’ देखील व्हायरल होत आहेत. मालिकेत आतापर्यंत बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहेत. सोहमचे आक्रस्ताळ वागणे, आसावरीचे त्याला पाठीशी घालणे, शुभ्राची घर सांभाळताना होणारी तारेवरची कसरत सगळे काही प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ठरले आहे. आता लवकरच मालिकेत खास सोहळा पाहायला मिळणार आहे. (Aggabai Sasubai Marathi Serial latest Update shoham shubhra marriage anniversary)

सध्या मालिकेत अभिजीत राजेंना घराबाहेर काढण्यासाठी सोहम अर्थात ‘बबड्या’ नव्या शकला लढवत आहे. बबड्याने सांगितल्याने, अभिजीत राजेंनी आसावरीला न सांगता घरातून काढता पाय घेतला होता. आसावरीच्या अनेक प्रयत्नांनंतरही, त्यांनी खोटी कारणे देत घरी परतण्यास नकार दिला होता. त्यातच ते आजारी पडल्याने आसावरी त्यांची भेट घेण्यासाठी ‘अभिज् किचन’मध्ये गेली होती. त्यानंतर मात्र, तिने थेट शुभ्रावर या सगळ्याचे खापर फोडण्यास सुरुवात केली होती.

शुभाने मंगळसूत्र घालण्यास नकार दिल्याने चिडलेल्या आसावरीने तिच्याशी नाते तोडून टाकण्याचा निर्णय घेतला होता. तर, दुसरीकडे कोणीतरी आसावरी निराधार असल्याचे सांगत, कोणीतरी त्यांच्या घरी आश्रमातील महिलेला पाठवले होते. त्याचवेळी घरात शुभ्राच्या आई-बाबांची एंट्री झाली आहे. घरातील बिघडलेल्या परिस्थितीचा अंदाज आल्याने शुभ्राचे आई-वडील तिच्या घरी येतात. त्यावेळी राजेंबद्दल चौकशी केली असता, आसावरी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळते. मात्र, नेमक्या त्याचवेळी आलेल्या आश्रमातील महिलेमुळे ही गोष्ट बाहेर पडणार तितक्यात अभिजीत राजेंनी घरात धडाकेबाज एंट्री घेतली आहे. (Aggabai Sasubai Marathi Serial latest Update shoham shubhra marriage anniversary)

मंगळसूत्र पुन्हा गळ्यात घालण्यासाठी शुभ्रा तयार होईल का?

सगळ्या प्रकारादरम्यान शुभ्राने त्यांना इथल्या परिस्थितीची कल्पना देऊन घरी बोलावून घेतले, असे अभिजीत राजे आसावरीला सांगतात. हे समजल्यावर सगळे राग-रुसवे विसरून आसावरी शुभ्राला माफ करते. शुभ्राचे आई-वडील घरी जायला निघाल्यानंतर सोहम अभिजीत राजेंना घरातून निघून जाण्यास सांगतो. गाडीची चावी सापडत नसल्याने, तो अभिजीत राजेंसाठी थेट कॅब बुक करतो. मात्र, शुभ्राला याची कल्पना आल्याने, ती मुद्दाम आईकडे थांबण्याचा हट्ट करते. अभिजीत राजे घराबाहेर पडत असतानाच शुभ्रा आणि तिची आई परत आल्याने बबड्याच्या सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फिरले आहे. (Aggabai Sasubai Marathi Serial latest Update shoham shubhra marriage anniversary)

मालिकेत आता सोहम आणि शुभ्राच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला जाणार आहे. दोघांच्याही घरचे ॲनिव्हसरी साजरी करण्याचे ठरवत आहेत.  दुसरीकडे आसावरी आणि अभिजीत शुभ्रा आणि सोहम यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आसावरी पुन्हा एकदा  शुभ्राला मंगळसूत्र न घालण्यावरून टोकणार आहे. शेवटी शुभ्रा आसावरीसाठी या सोहळ्यात सोहमच्या हातून मंगळसूत्र घालून घेण्याचा निर्णय घेणार आहे. सोहळ्यासाठी घरी आलेल्या सर्व मंडळींना सोहम घराबाहेर जायला सांगून,  शुभ्रावर मंगळसूत्र घालण्यासाठी दबाव टाकणार आहे. त्याचवेळी आलेल्या आसावरीला या मंगळसुत्र प्रकरणामागचे सत्य कळणार आहे. सत्य समोर आल्यानंतर आसावरी नक्की कोणाच्या बाजूने उभी राहणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

(Aggabai Sasubai Marathi Serial latest Update shoham shubhra marriage anniversary)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.