AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OMG! ऐश्वर्याला नेमकं काय झालंय? रॅम्प वॉकचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचा पडला प्रश्न

ऐश्वर्या राय आणि सौंदर्य हे जणू समीकरण आहे. विश्वसुंदरी ठरलेल्या ऐश्वर्याने नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने रॅम्पवॉक सुद्धा केला. मात्र रॅम्पवॉकच्या या व्हिडीओमुळे ऐश्वर्याला ट्रोल केलं जातंय. नेटकऱ्यांनी तिला वाढलेल्या वजनामुळे ट्रोल केलं आहे.

OMG! ऐश्वर्याला नेमकं काय झालंय? रॅम्प वॉकचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचा पडला प्रश्न
Aishwarya RaiImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2023 | 11:24 AM
Share

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : ऐश्वर्या राय म्हटलं की सर्वांत आधी डोळ्यांसमोर तिचं सौंदर्य येतं. विश्वसुंदरी ठरलेल्या ऐश्वर्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. आजही कोणत्याही कार्यक्रमात जेव्हा ती हजेरी लावते, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असतात. केवळ भारतातच नाही तर जगभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. म्हणूनच परदेशातील प्रतिष्ठित सोहळ्याच्या रेड कार्पेटवर जेव्हा एखादी बॉलिवूड अभिनेत्री हजेरी लावते, तेव्हा तिथले फोटोग्राफर्स तिला ऐश्वर्या राय म्हणूनच हाक मारताना दिसतात. यावरूनच तिची प्रसिद्धी सहज लक्षात येते. ऐश्वर्या नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. यावेळी रॅम्पवर तिचा जलवा पहायला मिळाला.

पॅरिस फॅशन वीकदरम्यान प्रसिद्ध आयफेल टॉवरजवळ लॉरियल पॅरिसतर्फे फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. लॉरियल पॅरिस हे पॅरिस फॅशन वीकसाठी अधिकृत पार्टनर आहेत. 2017 पासून या फॅशन शोची सुरुवात झाली. ‘वॉक युअर वर्थ’ या शोचं यंदाचं सहावं वर्ष होतं. यावेळी जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. केंडल जेनर, इव्हा लाँजोरिया, अँडी मॅकडॉवेल, हेलेन मिरेन, अजा नाओमी किंग, वोयला डेविस यांच्यासोबतच ऐश्वर्यासुद्धा या फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने सोनेरी रंगाचा चमचमता गाऊन परिधान केला होता.

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Rai (@aishclips)

ऐश्वर्याला पहिल्यांदाच ब्लाँड हायलाइट्समध्ये पाहिलं गेलं. शोस्टॉपर ऐश्वर्याने रॅम्प वॉक करताना सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. तिच्या या रॅम्पवॉकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐश्वर्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी तिचं कौतुक केलं. मात्र काही जणांनी ऐश्वर्याला तिच्या वाढत्या वजनावरून ट्रोल केलं. ऐश्वर्याने बोटॉक्समुळे आपल्या नैसर्गिक सौंदर्याची वाट लावली, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर तिने माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, सोनाली बेंद्रे यांच्याकडून काहीतरी शिकावं, अशा शब्दांत काहींनी टीका केली.

यंदाच्या पॅरिस फॅशन वीकमध्ये बच्चन कुटुंबातील एक नव्हे तर दोन सदस्य सहभागी झाले आहेत. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदासुद्धा ‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये लॉरियल पॅरिससाठी ॲम्बेसेडर म्हणून तिची निवड करण्यात आली. नव्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पॅरिसमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.