Bachchan family : बच्चन कुटुंबाच्या नकळत ऐश्वर्या – आराध्या यांनी केलंय ‘असं’ काम, तुम्हीही म्हणाल…
Bachchan family : बच्चन कुटुंबाच्या नकळत ऐश्वर्या - आराध्या यांनी असं काय केलं? ज्यामुळे सर्वत्र चर्चांना आलंय उधाण... फार कमी लोकांना माहिती आहे 'हे' सत्य... ऐश्वर्या कायम आराध्या हिच्यासोबत असते. दोघींचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर होतात व्हायरल...

मुंबई : 29 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कायम तिची मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत अनेक ठिकाणी पोहोचते. दोघींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, अभिनेत्री लेकीबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते. आता देखील ऐश्वर्या – आराध्या यांच्याबद्दल मोठी गोष्ट समोर येत आहे. ज्यामुळे पुन्हा बच्चन कुटुंबाची सून आणि नात चर्चेत आल्या आहेत. ऐश्वर्या – आराध्या सर्वांपासून लपून काही गोष्टी करतता, ज्याचा खुलासा खुद्द ऐश्वर्या हिने मुलाखतीच्या माध्यमातून केला आहे.
२०१८ मध्ये झालेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या हिने तिच्याबद्दल आणि मुलीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ऐश्वर्या – आराध्या लपून मुंबईतील दोन – तीन बागेत गेल्या आहेत. ऐश्वर्या – आराध्या सेलिब्रिटी असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाणं त्यांना शक्य नसतं.
ऐश्वर्या म्हणाली, ‘रस्त्याने जात असताना जर बागेत कोणी दिसलं नाही तर, मी आणि आराध्या बागेत जातो आणि खूप खेळतो. आराध्यामध्ये मला माझं बालपण दिसतं. मी रोज तिला शाळेत सोडायला जाते घ्यायला जाते. तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायला मला फार आवडतं… ‘
पुढे ऐश्वर्या म्हणाली, ‘जेव्हा मुलं प्रसिद्धीझोतात येतात तेव्हा त्यांच्यातील बालपण हरवतं. पण आराध्या हिचं बालपण अद्यापही कायम आहे…’ शिवाय आता आराध्या हिला पापाराझींची सवय झाली आहे… असं देखील ऐश्वर्या म्हणाली. ऐश्वर्या कायम कुठेही लेकीचा हात धरुन चालते. म्हणून ऐश्वर्या हिला ट्रोल देखील करण्यात आलं. पण यावर अभिनेत्रीने कोणतंही उत्तर दिलं नाही.
सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या – आराध्या यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर ऐश्वर्या देखील आराध्या आणि पती अभिषेक बच्चन याच्यासोबत फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करत असते. सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या हिची चर्चा रंगलेली असते.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न २००७ मध्ये झालं. फार कमी लोकांच्या उपस्थिती दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नानंतर २०११ मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. आराध्या आता १३ वर्षांची झाली आहे.
