AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय हिला स्टेजवर पाहिल्यानंतर सलमान खान आनंदी, चाहते म्हणाले, ‘प्रेम तर खरं होतं…’

Aishwarya Rai Bachchan - Salman Khan : 'प्रेम तर खरं होतं...', ऐश्वर्या राय हिला पाहिल्यानंतर खास असतात सलमना खान याच्या भावना... 'तो' व्हिडीओ पाहून तुम्ही देखील म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान - ऐश्वर्या यांच्या व्हिडीओची चर्चा...

ऐश्वर्या राय हिला स्टेजवर पाहिल्यानंतर सलमान खान आनंदी, चाहते म्हणाले, 'प्रेम तर खरं होतं...'
| Updated on: Jan 31, 2024 | 10:58 AM
Share

मुंबई | 31 जानेवारी 2024 : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सलमान – ऐश्वर्या बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी तर आहेतच पण खासगी आयुष्यामुळे दोघे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा होती. ‘हम दिल दे चूके सनम’ सिनेमानंतर दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. पण सलमान – ऐश्वर्या यांचं नाव लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आजही त्यांच्या नात्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते.

सध्या सोशल मीडियावर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना असला तरी, चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या हिला स्टेजवर परफॉर्म करताना पाहून सलमान खान याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहून चाहत्यां देखील दोघांच्या नात्याची आठवण झाली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री स्टेजवर ‘डोला रे डोला’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान देखील दिसत आहे. सलमान एक टक ऐश्वर्या हिच्याकडे पाहाताना दिसत आहे. ऐश्वर्या हिचा परफॉर्मेन्स संपल्यानंतर सलमान खान जोर-जोरात टाळ्या वाजवताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान – ऐश्वर्या यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

सलमान – ऐश्वर्या यांच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ऐश्वर्या हिने आराध्या हिला जन्म दिला. पण सलमान खान पुढे जाऊच शकला नाही…’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘प्रेम तर खरं होतं…’ नेटकरी कमेंट करत सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

ऐश्वर्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. पण सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याचा अंत फार वाईट होता. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं..

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर ऐश्वर्या हिने 2011 मध्ये लेक आराध्या हिली जन्म दिला. अभिनेत्रीच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. ऐश्वर्या आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसते. अभिनेत्री कोणताही सिनेमा साईन करण्याआधी विचार करते.

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.