
बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या ऐश्वर्या राय बच्चन अभिनय किंवा चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकताच 1 नोव्हेंबर रोजी तिचा 52 वा वाढदिवस साजरा केला. ऐश्वर्याची इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख आहे. तिने ती स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिचे आयुष्य फारच ग्लॅमरस आहे. परंतु तिचे वैयक्तिक आयुष्यही फार गुंतागुंतीचे राहिले आहे. अभिषेकसोबत लग्न करण्याच्या आधी तिचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं आहे. पण असेही काही कलाकार आहेत ज्यांच्यासोबत ऐश्वर्याचा 36 चा अकडा आहे. ते कित्येक वर्षापासून एकमेकांचे तोंडही पाहत नाही. ते कोण सेलिब्रिटी आहेत जाणून घेऊयात.
करीना कपूर
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्यात चांगले संबंध नाहीत. एका पुरस्कार सोहळ्यात करीनाने ऐश्वर्याच्या हातातून मायक्रोफोन हिसकावून घेतल्याचं देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच त्यांच्यात सुरु असलेलं कोल्ड वॉर हे करीनानेच सुरु केलं होतं असंही म्हटलं जातं. त्यानंतर त्यांचा हा वाद असाच राहिला असून तेव्हापासून ते एकत्र दिसलेले नाहीत.
विवेक ओबेरॉय
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यातील नाते एकेकाळी चर्चेत होते. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या विवेकला डेट करू लागली होती. तथापि, विवेक ओबेरॉयने सलमान खानबद्दल माध्यमांना दिलेल्या वादग्रस्त विधानांमुळे हे नाते संपुष्टात आले. तेव्हापासून दोघांनी बोलणे बंद केले आहे.
राणी मुखर्जी
अभिनेत्री राणी मुखर्जी आणि ऐश्वर्या राय बच्चन एकमेकांच्या फार छान मैत्रिणी होत्या. अनेक कार्यक्रमात त्या एकत्रही दिसत असतं. पण सलमान आणि ऐश्वर्याच्या वादानंतर “चलते चलते” चित्रपटात ऐश्वर्याला रिप्लेस करून राणीला घेण्यात आले होते. राणीने ही गोष्ट ऐश्वर्यापासून लपवून ठेवल्यामुळे ती दुखावली होती तेव्हापासून ऐश्वर्याने राणीशीही बोलणं बंद केलं आहे.
सुष्मिता सेन
ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन यांच्या ‘मिस इंडिया 1994′ पासूनच दुरावा आला. मिस इंडिया 1994’ सुष्मिता सेन जिंकली आणि ऐश्वर्याने तिच्यासोबत बोलायचं बंद केलं.
सोनम कपूर
सोनम कपूर एकदा मीडियासमोर ऐश्वर्या रायला ‘आंटी’ म्हणाली होती. त्यामुळे ऐश्वर्या खूप नाराज झाली होती. त्यावेळी सोनम आणि ऐश्वर्या लॉरियल ब्रँडसाठी काम करत होत्या. पण या वक्तव्यामुळे सोनम आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.