जुहूतील आलिशान घर कि दुबईतील व्हिला, ऐश्वर्या राय तिचा बहुतेक वेळ कुठे घालवणे पसंत करते?
बॉलिवूडची सौंदर्यवती आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनचा आज 52 वा वाढदिवस आहे. ती आजही तेवढीच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. ऐश्वर्याची भारतासह , दुबईतही आलिशान प्रॉपर्ट आहे, व्हिला आहे. पण ऐश्वर्याला नक्की कुठे वेळ घालवणं जास्त पसंत आहे मुंबईतील जुहू येथे कि दुबईत? चला जाणून घेऊयात.

बॉलिवूडची सौंदर्यवती आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनचा आज 1 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. तिच्या करोडो चाहत्यांकडून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. ऐश्वर्या राय तिचा 52 वाढदिवस साजरा करत आहे. पण या वयातही ती तेवढीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. दरम्यान ऐश्वर्याने तिच्या अभिनयाने आणि तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि आजही करते. तसेच तिने आतापर्यंत नेम, फेमसोबतच तिने संपत्तीही कामवली आहे.
जुहूमधील राजवाड्यासारखे सासरचे घर
ऐश्वर्या राय बच्चनचे मुंबईतील जुहू येथे कुटुंबासोबत राहत असलेला बंगला “जलसा” किती आलिशान आहे हे सर्वांनाच माहित आहे. या घरात ऐश्वर्या अमिताभ बच्चन, जया बच्चन, पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या यांच्यासोबत राहते. तसेच तिची मेहुणी श्वेता नंदा आणि तिची मुले, नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा हे देखील बहुतेक वेळा जुहूमधील घरातच राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जलसाची किंमत 100 कोटींपेक्षा जास्त आहे आणि घरचा कार्पेट एरिया 10,125 चौरस फूट असल्याचं म्हटलं जातं.
दुबईमधील आलिशान व्हिला
ऐश्वर्या राय तिच्या कुटुंबासोबत राहत असली तरी तिने रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे. तिच्या मालमत्तेपैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे दुबईतील तिचा आलिशान व्हिला.ऐश्वर्या कोट्यवधी डॉलर्सची मालकीण आहे. भारतात आणि परदेशात संपत्ती आहे. तिच्या लक्झरी जीवनशैलीबद्दल ती नेहमीच प्रसिद्ध असते. तिची दुबईमध्ये देखील प्रॉपर्टी आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनने दुबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. त्यांनी 2015 हा व्हिला जवळपास 16 कोटी रुपयांना खरेदी केले होता. जुमेराह गोल्फ इस्टेटमध्ये असलेल्या या व्हिलामध्ये एक मोठी बाग, एक स्विमिंग पूल आणि एक गोल्फ कोर्स यासह अनेक सुविधा आहेत. दरम्यान हा व्हिला मुलगी आराध्यासाठी त्यांनी गुंतवणूक म्हणून खरेदी केला आहे.
ऐश्वर्याला नेमकं कुठे वेळ घालवणं जास्त आवडतं
ऐश्वर्याला नेमकं कुठे वेळ घालवणं जास्त आवडतं तर ते म्हणजे तिच्या मुंबईतील जुहू येथील घरात. ती कामासाठी नेहमीच प्रवास करत असते. पण ती शक्यतो जुहू येथील घरीच सर्वांसोबत वेळ घालवणे पसंत करते. दुबईतील घरी देखील हे जोडपे जाते पण ते केवळ सुट्टी ऐन्जॉय करण्यासाठी.
