
Threat by Gangste from Pakistan | बॉलिवूड सेलिब्रिटी कायम गँगस्टर आणि अंडरवर्ल्डच्या निशाण्यावर असतात. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींवर हल्ला झाला आहे, तर अनेकांना जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली आहे… आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्याने पाकिस्तानातून मिळालेल्या धमकीबद्दल मौन सोडलं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेते विवेक ओबेरॉय आहे.. एक काळ असा होता जेव्हा विवेक अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत होता. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने मिळालेल्या धमकीबद्दल सांगितलं आहे…
2009 मध्ये ‘कुर्बान’ सिनेमाची शुटिंग करत असताना विवेक ओबेरॉय याला फोन आलेला. तेव्हा अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होची… अमेरिकेत “कुर्बान” सिनेमाचं चित्रीकरण करत होतो तेव्हा मला एक फोन आला आणि माझ्या आंसरिंग मशीनवर धमकीचा मेसेज सोडला.
सुरुवातीला विवेक याने धमकीकडे फारसं लक्ष दिलं नाही… विवेक म्हणाला, ‘मी अमेरिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांनाही या घटनेची तक्रार केली. खरं तर, स्थानिक प्रॉडक्शन टीमने मला सांगितलं की, धमकीची तक्रार करणं आवश्यक आहे. या सर्व प्रकरणाचा सामना करण्यासाठी मला अमेरिकेत एका वकीलाची नियुक्ती देखील करावी लागली.’
विवेक याने सांगितल्यानुसार, त्याठिकाणी पोलीस बोलवण्यात आली आणि चौकशी सुरु झाली… ‘मी पोलिसांना सांगितलं… मला माहिती नाही ते कोण आहेत… ते मला म्हणाले, सर्वकाही संपवू आणि उडवून देऊ… त्यानंतर पोलिसांनी नंबर ट्रेस केला तेव्हा कळलं की नंबर पाकिस्तानचा आहे… त्यानंतर मात्र मला भीती वाटू लागली…’
विवेक पुढे म्हणाला, ‘त्या फोननंतर मला माझ्या सुरक्षेची काळजी वाटू लागली…सुरुवातीला मला वाटलं नशेमध्ये कोणी केलं असेल… पण नंतर कुटुंब आणि माझ्या सुरक्षेसाठी मला सेक्योरिटी ठेवावी लागली… मी मुंबईत परतल्यावर पुन्हा धमक्या येऊ लागल्या. मग मला पोलीस संरक्षण घ्यावं लागलं.’ विवेक सध्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मस्ती 4’ सिनेमात दिसत आहे.