AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय हिने थेट कॅमेऱ्यासमोरच केले या व्यक्तीला किस, ‘तो’ फोटो व्हायरल, अभिनेत्री…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहेत.

ऐश्वर्या राय हिने थेट कॅमेऱ्यासमोरच केले या व्यक्तीला किस, 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्री...
Aishwarya Rai
| Updated on: Sep 16, 2024 | 6:21 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या राय ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत 2007 मध्ये लग्न केले. विशेष म्हणजे त्यावेळीचे हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारे एक लग्न होते. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खानला डेट करत होती.

ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याबद्दल विविध चर्चा रंगत असताना त्यावर कोणीही भाष्य करत नाहीये. आता नुकताच ऐश्वर्या राय ही दुबईमध्ये SIIMA 2024 मध्ये पोहोचली होती. विशेष म्हणजे यावेळी ऐश्वर्याला पुरस्कार देखील मिळाला. मात्र, यावेळी ऐश्वर्या हिच्यासोबत अभिषेक बच्चन हा पोहोचला नाही. आईला सपोर्ट करण्यासाठी आराध्या बच्चन ही पोहोचली. 

ऐश्वर्या राय हिने ज्यावेळी पुरस्कार घेतला त्यावेळी तिथे उपस्थित आराध्या बच्चन ही ऐश्वर्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट करताना दिसली. हेच नाही तर ज्यावेळी ऐश्वर्या राय ही फोटोसाठी पोझ देत होती, त्यावेळी तिच्या बाजूला आराध्या बच्चन ही उभी दिसली. ऐश्वर्या राय ही प्रेमाने आपल्या मुलीला किस देताना दिसली.

Aishwarya Rai

आराध्या बच्चन ही आई ऐश्वर्याला काहीतरी बोलत होती, त्यावेळी ऐश्वर्या राय ही अचानक मुलगी आराध्या हिला लिप्स किस देताना दिसली. आता याचेच काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधून ऐश्वर्या आणि तिच्या मुलीमधील प्रेम दिसत आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांचे नेहमीच सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय ही आपल्या मुलीसोबत विदेशात जाताना दिसली. आराध्या बच्चन ही सतत आई ऐश्वर्या हिच्यासोबत विदेशात जाताना दिसते. हेच नाही तर अनेकांनी म्हटले होते की, आराध्या ही शाळेत जाते की नाही? ऐश्वर्या राय हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, आराध्या ही दररोज शाळेत जाते आणि तिच्या शाळेचे व्यवस्थित नियोजन करून ऐश्वर्या तिला विदेशात घेऊन जाते.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान