AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai: अमिताभ बच्चन यांच्यासाठी सून ऐश्वर्या रायची खास पोस्ट; नेटकरी म्हणाले ‘ती खूप प्रयत्न करते पण..’

Aishwarya Rai: ऐश्वर्याच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा बच्चन कुटुंब सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऐश्वर्याची ही पोस्ट काय आहे, ते पहा..

Aishwarya Rai: अमिताभ बच्चन यांच्यासाठी सून ऐश्वर्या रायची खास पोस्ट; नेटकरी म्हणाले 'ती खूप प्रयत्न करते पण..'
अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन, अभिषेक बच्चनImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 12, 2026 | 2:10 PM
Share

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबर रोजी त्यांचा 84 वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी देशभरातील चाहते आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, या सगळ्यात त्यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ऐश्वर्याने वाढदिवशी उशिरा रात्री अमिताभ बच्चन आणि त्यांची नात आराध्या यांचा एक खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या पोस्टनंतर काही चाहत्यांनी तिच्या प्रेमळ संदेशाचं कौतुक केलं, तर काहींनी पोस्ट करण्याच्या वेळेवरून प्रश्न उपस्थित केले.

ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अमिताभ बच्चन आणि आराध्या यांचा एक सुंदर फोटो शेअर केला. या फोटोमध्ये अमिताभ आपल्या लाडक्या नातीला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहेत. फोटोसोबत ऐश्वर्याने लिहिलं, ‘प्रिय पा-दादाजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्यावर नेहमी प्रेम आणि देवाचा आशीर्वाद राहो.’

ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. ती सहसा तिच्या कामाशी संबंधित पोस्ट किंवा कुटुंबातील खास प्रसंगी फोटो शेअर करताना दिसते. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्तही तिने आराध्यासोबतचा फोटो शेअर करण्याची परंपरा कायम ठेवली. मात्र, यावेळी तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी तिच्या पोस्टचं कौतुक करत अमिताभ आणि आराध्या यांच्या नात्याला सुंदर म्हटलं. तर काहींनी वाढदिवसाच्या दिवशी उशिरा पोस्ट केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी बच्चन कुटुंबातील नातेसंबंधांबाबतही तर्कवितर्क मांडले.

पहा फोटो-

ऐश्वर्या नेहमीच तिच्या सासऱ्यांविषयी प्रेमळ असते, पण अमिताभ बच्चन कधीच तिच्याविषयी काही पोस्ट करत नाही, असं एकाने लिहिलं. तर ऐश्वर्या तिच्या सासूच्या वाढदिवशी कधीच पोस्ट करत नाही, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘सर्वकाही चांगलं आहे, असं दाखवण्यासाठी ऐश्वर्या खूप धडपड करते. पण बच्चन कुटुंबीयांना कधीच तिच्यासाठी काही विशेष प्रयत्न केल्याचं पाहिलं नाही’, असाही टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे.

दरम्यान, अमिताभ यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शत्रुघ्न सिन्हा, चिरंजीवी, कमल हासन, अजय देवगण, काजोल आणि माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक कलाकारांनी महानायकावर प्रेमाचा वर्षाव केला. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी मुंबईतील त्यांच्या ‘जलसा’ या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अमिताभ यांनीही घराबाहेर येऊन चाहत्यांचं अभिवादन स्वीकारलं आणि त्यांचे आभार मानले.

Follow Us
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...