
वयाच्या 52 व्या वर्षानंतरही, बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सौंदर्यात आजही इतर अभिनेत्रींना टक्कर देते. ती तिच्या चित्रपटांपेक्षाही वैयक्तिक आयुष्याबद्दल कायम चर्चेत असते. तसेच ऐश्वर्या तिच्या संपत्तीबद्दलही नेहमी चर्चेत असते. तिने इतके वर्ष मेहनत करून तिची स्वत:ची संपत्ती जमवली आहे. पण हे फार कमी जणांना माहित असेल की ऐश्वर्या सासरपेक्षाही एका घरात जास्त वेळ राहते.
ऐश्वर्या सासरपेक्षाही या घरात जास्त वेळ राहते.
ऐश्वर्या तिच्या सासरच्या सर्व सणांमध्ये, कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असते. पण ऐश्वर्या राय तिच्या सासरी म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यापेक्षा ती तिची आई वृंदा राय यांच्या घरी जास्त असते. तिच्या माहेरी ती आईसोबत जास्त वेळ घालवते. तिच्या आईचा ‘वृंदा’ हा बंगला जलसापेक्षाही सुंदर असल्याचं बोललं जातं.
‘जलसा’ पेक्षाही सुंदर आहे हे घर
या घराचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.त्यावरून ऐश्वर्या रायचे माहेरचे खूपच सुंदर असल्याचे दिसून येते. घराची सजावट आणि साधेपणा मन नक्कीच जिंकते. इंटेरिअरच्याबाबतीत ते ‘जलसा’ पेक्षाही सुंदर असल्याचे दिसते. ऐश्वर्याच्या माहेरच्या या घरात एक भिंत खास आहे. त्या भिंतीवर बरेच फोटो लावलेले दिसतील. या भिंतीवर कुटुंबाचे वेगवेगळ्या क्षणांचे फोटो आहेत ज्याला ‘आठवणींची भिंत’ असंच म्हटलं जातं. एकाच शेल्फवर लहान फ्रेममध्ये असलेल्या बऱ्याच फोटोंमध्ये, वेगवेगळे कौटुंबिक क्षण टिपलेले दिसतात.
भारतीय संस्कृतीचा एक कोपरा
या फोटोंमध्ये सोनेरी गणेशमूर्ती आणि धार्मिक मूर्ती दिसत आहेत. सजावटीमध्ये पारंपारिक चित्रे आणि कलाकृतींच्या फ्रेमही दिसत आहेत.
क्लासिक लाकडी फ्रेम आणि शेल्फ
भिंतींवरील फोटो फ्रेम आणि शेल्फ् ‘चे अव रुप गडद तपकिरी लाकडापासून बनवलेले आहेत, जे भिंतींच्या हलक्या रंगांसह, जसे की क्रीम किंवा ऑफ-व्हाइट, एक आकर्षक कॉन्ट्रास्ट निर्माण करतात. उल्लेखनीय म्हणजे, भिंतीवरील पेंटिंग्ज देखील त्याच रंगात असलेल्या दिसत आहेत, जे काळा आणि तपकिरी रंग हायलाइट करतात. शिवाय, गायीचे हे पेंटिंग देखील एका वेगळ्याच अंदाजात असलेलं दिसत आहे.
अमिताभच्या बंगल्यातही लक्ष वेधून घेणारी भींत
भिंतींच्या सजावटीच्या बाबतीत ऐश्वर्या रायचे माहेरचे घर हे सगळ्यात सुंदर उदाहरण असलं तरी त्यासोबतच जलसामधील इंटेरिअरही तेवढंच आकर्षित आहे. जलसामध्ये एक भिंत अशी आहे जी लक्ष वेधून घेते. या भिंतीच्या मध्यभागी एका गाईचं पेंटींग आहे. हे पेंटिंग पारंपारिक भावना देतात.