AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajay Devgn : अखेर प्रतीक्षा संपली, अजय देवगन चाहत्यांना देणार मोठी भेट

Ajay Devgn : १८ महिन्यांमध्ये अजय देवगन चाहत्यांना देणार मोठी भेट, जाणून तुमचाही उत्साह पोहोचेला शिगेला... नक्की कोणत्या आहेत 'त्या' भेटवस्तू? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अजय देवगन याची चर्चा... चाहत्यांची देखील प्रतीक्षा संपली....

Ajay Devgn : अखेर प्रतीक्षा संपली, अजय देवगन चाहत्यांना देणार मोठी भेट
| Updated on: Oct 22, 2023 | 10:09 AM
Share

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेता अजय देवगन कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेत्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. ज्यामुळे अभिनेता चर्चेत आहे. येत्या १८ महिन्यांमध्ये अभिनेता चाहत्यांना पाच मोठ्या भेटी देणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. गेल्या तीन दशकांपासून अभिनेता चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. इंडस्ट्रीमध्ये अजय याने अनेक नवीन प्रयोग केले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिवर किती कोटी रुपयांचा गल्ला जमा होईल याकडे अभिनेता बिलकूल लक्ष देत नाही. पण दिग्दर्शकाचा मुलगा असल्यामुळे अजय कायम काहीतरी नवीन आणि हटके प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा प्रयत्न करत असतो..

दरम्यान, अजय देवगन याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या ६ महिन्यात अभिनेत्याचे अनेक सिनेमे चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. पण यासोबतच या अभिनेत्याचे अनेक सिक्वेल सिनेमे देखील येत्या काही दिवसांत तयार होणार आहेत. त्यामुळे येत्या 2 वर्षात अजय देवगन याचे अनेक नवीन सिनेमे चाहत्यांना पाहाता येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १८ महिन्यांत अजय देवगणचे पाच फ्रँचायझी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये ‘दे दे प्यार दे 2’, ‘सिंघम अगेन’, ‘रेड’ 2, ‘सन ऑफ सरदार 2’ आणि ‘धमाल 4’ सारख्या सिनेमे चर्चात आहेत. त्यामुळे येत्या १८ महिन्यांमध्ये अजय याच्या ५ सिनेमांचे सिक्वल चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.

याआधीच अजय देवगन याचा दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्यासोबतचा गोलमाल सिनेमा आणि त्याचे सिक्वल सुपरहिट ठरले. याशिवाय त्याचा सिंघम, रेड आणि सन ऑफ सरदार या सिनेमांनी देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता पुन्हा अजय चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.

अजय याचे ‘हे’ सिनेमे देखील होणार प्रदर्शित

अजय देवगन याचा ‘मैदान’ हा सिनेमा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. याशिवाय त्याचा ‘औरों में कहां दम था’ हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. अजय देवगन आता दिग्दर्शक म्हणूनही कौतुकास्पद काम करत आहे. ‘भोला’ हा सिनेमा देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. सध्या सर्वत्र अजय देवगन याच्या सिनेमांची चर्चा रंगली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?