AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nysa Devgn | अजय देवगणच्या मुलीची बॉयफ्रेंडसोबत जोरदार पार्टी; जाणून घ्या कोण आहे वेदांत?

‘न्यासाने आईवडिलांचं नावच खराब केलं’, अशी टीका एका युजरने केली होती. तर ‘ही पूर्ण नशेतच आहे वाटतं’ असं दुसऱ्याने लिहिलं होतं. न्यासा एक टक्कासुद्धा तिच्या आईसारखी नाही, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं होतं.

Nysa Devgn | अजय देवगणच्या मुलीची बॉयफ्रेंडसोबत जोरदार पार्टी; जाणून घ्या कोण आहे वेदांत?
Nysa DevgnImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 05, 2023 | 2:27 PM
Share

लंडन : अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची लाडकी लेक निसा देवगण नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधल्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्टारकिड्सपैकी ती एक आहे. निसाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. मात्र त्यापूर्वीच ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तर अनेकदा निसा तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे ट्रोल होताना दिसते. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसतेय. विशेष म्हणजे निसाच्या या फोटोंमध्ये तिचा कथित बॉयफ्रेंडसुद्धा पहायला मिळतोय. वेदांत महाजन असं त्याचं नाव आहे. खास मित्र ओरहान अवत्रमणी आणि बॉयफ्रेंड वेदांतसोबत निसाने लंडनमध्ये प्रसिद्ध पॉप स्टार बियॉन्सेच्या कॉन्सर्टला हजेरी लावली.

निसाच्या एका फॅन क्लब पेजवर तिचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. बियॉन्सेच्या कॉन्सर्टसाठी ती मित्रमैत्रिणींसोबत लंडनला गेली होती. या कॉन्सर्टदरम्यान तिने खूप धमाल केली असून त्याचेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये निसासोबत असलेल्या एका तरुणाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा तरुण निसाचा बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे.

पहा फोटो

कोण आहे वेदांत महाजन?

गेल्या काही महिन्यांपासून निसा ही 25 वर्षीय वेदांत महाजन या तरुणाला डेट करत असल्याचं समजतंय. मात्र याबद्दल तिने अद्याप कोणती प्रतिक्रिया दिली नाही. वेदांत हा कमी वयात यशस्वी व्यावसायिक ठरला आहे. तो मूळचा दिल्लीचा असून विविध बॉलिवूड पार्ट्यांचं आयोजन तो करतो. त्याने आपल्या कंपनीची सुरुवात कॉलेज विद्यार्थ्यांसाठी न्यू-इअर पार्टीचं आयोजन करून केली होती. यासोबतच तो लंडनमधील UCL मध्ये शिक्षणसुद्धा घेत आहे.

गेल्या काही महिन्यांत न्यासा देवगणचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळालं. न्यासा आता पहिल्यापेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. सोशल मीडियावरही तिला मोठा चाहतावर्ग आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातील न्यासाने तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बॅक-टू-बॅक पार्टी केली होती. न्यू इअर पार्टीतील न्यासाचा लूक आणि तिचा बोल्ड अंदाज अजय देवगणच्या चाहत्यांना फारसा पसंत पडला नव्हता.

‘न्यासाने आईवडिलांचं नावच खराब केलं’, अशी टीका एका युजरने केली होती. तर ‘ही पूर्ण नशेतच आहे वाटतं’ असं दुसऱ्याने लिहिलं होतं. न्यासा एक टक्कासुद्धा तिच्या आईसारखी नाही, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं होतं.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत