AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पठानों से कहना, चौहान आ रहा है..; अजय देवगण करणार ‘धुरंधर’चा खेळ खल्लास?

अभिनेता अजय देवगणने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. पठानों से कहना, चौहान आ रहा है.. या एका डायलॉगने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

पठानों से कहना, चौहान आ रहा है..; अजय देवगण करणार 'धुरंधर'चा खेळ खल्लास?
अजय देवगणImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 26, 2026 | 11:28 AM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीवर गेल्या काही महिन्यांपासून रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटांचाच बोलबाला पहायला मिळाला. या दोन्ही चित्रपटांनी मिळून बॉक्स ऑफिसवर हजारो कोटी रुपयांची कमाई केली. त्यापूर्वी शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटानेही जबरदस्त गल्ला जमवत सर्वांना थक्क केलं होतं. आता शाहरुख खान आणि रणवीर सिंह या दोघांनाही मात देण्यासाठी अभिनेता अजय देवगणने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. अजय देवगणला प्रेक्षक ॲक्शन जॉनरमध्ये खूप पसंत करतात. त्याच्या या चित्रपटात हाच अंदाज अत्यंत वेगळ्या पद्धतीने पहायला मिळणार आहे. ‘चौहान’ असं त्याच्या चित्रपटाचं नाव आहे.

वडील वीरू देवगण यांच्या जन्मदिनी अजयने त्याच्या या नव्या ॲक्शन चित्रपटाची घोषणा केली. 2 मिनिट 24 सेकंदांच्या ‘चौहान’च्या या टीझरमध्ये काश्मीरचा माहौल दाखवण्यात आला आहे, जिथे दंगलखोर जवानांवर दगडफेक आणि इतर शस्त्रांनी हल्ला करताना दिसतात. त्यानंतर चित्रपटाचा नायक ‘चौहान’ याची ओळख करून दिली जाते. सुरक्षा दल आणि भारतासाठी धोका निर्माण कऱणाऱ्या दहशतवाद्यांना सामोरं जाण्यासाठी तो सज्ज असतो. चौहानच्या भूमिकेतील अजयचा अर्धा चेहरा मास्कने झाकलेला असतो. त्याच्या हातात एक बॅग असते. त्याच्या एण्ट्रीवर अमिताभ बच्चन यांच्या ‘जुम्मा चुम्मा दे दे’ या सुपरहिट गाण्याची धून वाजते. काश्मीरमधील बंडखोरीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचं आश्वासन तो देतो.

या टीझरमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा डायलॉग म्हणजे, “पठानों से कहना, चौहान आ रहा है..” अजयने या डायलॉगद्वारे शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाला टोमणा लगावला आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काहींच्या मते हा शाहरुखच्या चित्रपटाला मारलेला गमतीशीर टोमणा आहे, तर इतरांच्या मते याचा कोणत्याही चित्रपटाशी संबंध जोडला जाऊ नये, हा केवळ अजय देवगणच्या ‘चौहान’ या पात्राचा रुबाब वाढवण्यासाठी आणि कथेला अधिक प्रभावी करण्यासाठी लिहिलेला सामान्य डायलॉग आहे.

नीरज यादव यांनी ‘चौहान’चं दिग्दर्शन केलं आहे. हा भव्यदिव्य ॲक्शन चित्रपट पुढच्या वर्षी 1 ऑक्टोबर 2027 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या एका डायलॉगमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?