AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3: अजय देवगणने विनंती करूनही मोहनलाल यांनी पाहिला नाही ‘दृश्यम 3’; समोर आलं कारण

Drishyam 3: अजय देवगणचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'दृश्यम 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वी अजयने साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना हा चित्रपट पाहण्याची विनंती केली. मात्र त्यांनी हा चित्रपट अद्याप पाहिला नाही.

Drishyam 3: अजय देवगणने विनंती करूनही मोहनलाल यांनी पाहिला नाही 'दृश्यम 3'; समोर आलं कारण
Ajay Devgn and MohanlalImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 01, 2026 | 2:38 PM
Share

Drishyam 3: अजय देवगणचा बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3: द कन्क्लुजन’ हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा हा तिसरा आणि अंतिम भाग असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे. या चित्रपटाबाबत आता अजय देवगणने एक खास खुलासा केला आहे. त्याने थेट मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना फोन करून चित्रपट पाहण्याची आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, मोहनलाल यांनी हा चित्रपट पाहिलाच नाही. त्यामागचं कारणसुद्धा अजयने स्पष्ट केलं आहे. ‘दृश्यम’ची मूळ कथा मल्याळम चित्रपटातून आली आहे. मोहनलाल यांनी या फ्रँचायझीमध्ये जॉर्जकुट्टी ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे, तर हिंदी आवृत्तीत अजय देवगण विजय साळगावकरच्या भूमिकेत आहे. त्यामुळे या कथेला पुढे नेताना मूळ चित्रपटाच्या नायकाची प्रतिक्रिया जाणून घेणं अजयला महत्त्वाचं वाटतं.

मोहनलाल यांनी का पाहिला नाही चित्रपट?

‘FICCI फ्रेम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अजयने सांगितलं की, त्याने मोहनलाल यांना फोन केला होता. ‘दृश्यम 3’ची कथा यावेळी पूर्णपणे वेगळ्या दिशेने जात असल्याने मोहनलाल यांनी हा चित्रपट पाहावा आणि त्यांची प्रतिक्रिया मिळावी, अशी अजयची इच्छा होती. मात्र मोहनलाल सुट्टीवर असल्यामुळे ते सध्या चित्रपट पाहू शकलेले नाहीत; मात्र लवकरच तो पाहतील, असं अजयने सांगितलं.

‘दृश्यम 3’ची कथा आधीच्या चित्रपटांपेक्षा वेगळी

‘दृश्यम 3’ केवळ आधीच्या दोन चित्रपटांची पुनरावृत्ती नाही. तर या तिसऱ्या आणि अंतिम भागात विजय साळगावकरच्या कथेचा पुढचा टप्पा दाखवताना नवीन ट्विस्ट आणि रहस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असं अजयने सांगितलं. कथा नेमकी कुठे घेऊन जायची, यावर निर्माते आणि लेखकांनी बराच काळ काम केलं. दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि लेखकांच्या टीमने अंतिम पटकथा निश्चित करण्यापूर्वी तब्बल चार वेगवेगळ्या स्क्रिप्टवर काम केल्याचं अजयने सांगितलं. प्रेक्षकांना ‘दृश्यम’कडून अपेक्षित असलेले ट्विस्ट, सस्पेन्स आणि धक्कादायक क्षण कायम ठेवतानाच कथा पुढे नेणं हे मोठं आव्हान होतं.

‘दृश्यम’सारखी कथा लिहिणं सोपं नसल्याचंही अजयने सांगितलं. त्याच्या मते, प्रत्येक भागात आधीच्या कथेपेक्षा काहीतरी नवीन आणि अनपेक्षित दाखवण्याची गरज असते. त्यामुळे फ्रँचायझीला विनाकारण पुढे न नेता योग्य टप्प्यावर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजयने ‘दृश्यम 3’ पाहिल्यानंतर वैयक्तिक मत व्यक्त करताना हा भाग ‘दृश्यम 2’पेक्षाही प्रभावी असल्याचं म्हटलं.

‘दृश्यम’च्या दोन्ही आवृत्त्यांमुळे अजय देवगण आणि मोहनलाल यांच्या अभिनयाची तुलना अनेकदा केली जाते. मात्र, अजयने स्वतः मोहनलाल यांच्याबद्दल आदर व्यक्त करत त्यांना चित्रपट दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता मोहनलाल हा चित्रपट पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया देतात, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा