Ajay Devgn | अजय देवगण याने लेकासोबतचा अत्यंत खास फोटो केला शेअर, युगवर प्रेमाचा वर्षाव करत म्हणाला
बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण याने एक अत्यंत खास फोटो शेअर केला आहे. अजय देवगण हा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय दिसतो. अजय देवगण याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. अजय देवगण हा काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसला.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा नेहमीच चर्चेत असतो. अजय देवगण याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठा धमाका करताना दिसत आहेत. अजय देवगण आणि काजोल हे बाॅलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारे जोडपे आहे. अजय देवगण याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. अजय देवगण आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून करतो. अजय देवगण हा काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबासोबत विदेशात धमाल करताना दिसला.
अजय देवगण याने विदेशातील शेअर केलेल्या फोटोमध्ये काजोल, नीसा आणि मुलगा युग हे दिसले. चाहते हे या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट देताना देखील दिसले. काजोल हिने देखील काही खास फोटो शेअर केले होते. मात्र, ती अजय देवगण याला सोडून मनीष मल्होत्रा याच्यासोबत डिनर डेला गेली. अनेकांनी या फोटोनंतर थेट विचारले की, अजय कुठे आहे.
अजय देवगण आणि काजोल यांचा मुलगा युग देवगण याचा आज वाढदिवस आहे. आपल्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त अजय देवगण याने सोशल मीडियावर एक अत्यंत खास पोस्ट शेअर केलीये. आता अजय देवगण याची हिच पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे अजय देवगण याने या फोटोसोबतच एक खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram
अजय देवगण याने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्या कुशीत तो बऱ्याच वर्षांपासून मोठा होत आहे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. फक्त जरा लवकर मोठा हो. अजय देवगण याने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा मुलगा युग हा त्याच्या मांडीवर झोपलेला दिसत आहे. आता अजय देवगण याने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
यासोबत लोक हे अजय देवगण याचा मुलगा युग याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण याचा दृश्यम 2 हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे दृश्यम 2 हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठे प्रेम देखील दिसले. अजय देवगण हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
