AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘समर सिंह आणि त्याच्या भावाने केली हत्या’; आकांक्षा दुबेच्या आईने केला खळबळजनक आरोप

जवळपास महिन्याभरापूर्वी आकांक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.

'समर सिंह आणि त्याच्या भावाने केली हत्या'; आकांक्षा दुबेच्या आईने केला खळबळजनक आरोप
Samar Singh and Akanksha DubeyImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 27, 2023 | 1:46 PM
Share

वाराणसी : भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर तिची आई मधू दुबे सोमवारी वाराणसीला पोहोचली. यावेळी मधू दुबे यांनी भोजपुरी गायक समर सिंह आणि संजय सिंह यांच्यावर हत्येचा आरोप केला. आकांक्षाने व्हॅलेंटाइन डेनिमित्त इन्स्टाग्रामवर समरसोबतचा फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. समर आणि संजयने मिळून माझ्या मुलीची हत्या केली, असा आरोप आकांक्षाच्या आईने केला आहे.

“समर सिंह आणि संजय सिंह यांनी आकांक्षाकडून तीन वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचं काम करून घेतलं होतं. मात्र त्याचे पैसे त्यांनी रोखून ठेवले होते. 21 तारखेला समर सिंहचा भाऊ संजयने आकांक्षाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबद्दल खुद्द तिनेच मला फोन करून सांगितलं होतं,” अशा दावा मधू दुबे यांनी केला.

रविवारी वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये आकांक्षा मृतावस्थेत आढळली. ती आत्महत्या करूच शकत नाही, असा दावा तिच्या काकीने केला होता. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा नीट तपास व्हावा, अशीही मागणी त्यांनी केली होती.

आकांक्षा दुबे तीन वर्षांची असतानाच आईवडिलांसोबत मुंबईला राहायला आली. तिने आयपीएस अधिकारी व्हावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. मात्र आकांक्षाला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयात रस होता. आकांक्षाचा जन्म 21 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तरप्रदेशमधल्या मिर्झापूरमध्ये झाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तर आकांक्षाचे टिकटॉक व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल झाले होते. भोजपुरी इंडस्ट्रीची ड्रीम गर्ल या नावाने ती ओळखली जायची.

2018 मध्ये आकांक्षा नैराश्यात गेल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यानंतर तिने कामातून काही काळ ब्रेक घेतला होता. नव्या कलाकारांना नवोदितांप्रमाणे वागणूक दिली जात नाही. म्हणूनच लोकांचा आत्मविश्वास नाहीसा होतो, असं ती त्यावेळी म्हणाली होती. नैराश्यातून बाहेर आल्यानंतर ती मोठ्या पडद्यावर पुन्हा परतली.

मेरी जंग मेरा फैसला या चित्रपटातून आकांक्षाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘मुझसे शादी करोगी’ (भोजपुरी), वीरों के वीर, फायटर किंग, कसम पैदा करने की 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

आत्महत्येच्या एक दिवस आधी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसली. जवळपास महिन्याभरापूर्वी आकांक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. सहकलाकार समर सिंगसोबतचे फोटो तिने पोस्ट केले होते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?