
अभिनेता अक्षय खन्ना याचे नशीब सध्या जोरावर आहे. लागोपाठ दुसरा सिनेमा त्याचा सुपरडूपर हिट ठरला आहे. अक्षयचा चित्रपटच केवळ हिट ठरलेला नाहीये, तर त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक होत आहे. आधी ‘छावा’मध्ये औरंगजेबचा रोल करून अक्षयने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याची औरंगजेबाची भूमिका प्रचंड गाजली होती. आता ‘धुरंधर’मध्ये (Dhurandhar) ‘रेहमान डकैत’ ही व्यक्तीरेखा साकारून त्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. दे श-विदेशातले लाखो चाहते, प्रेक्षकहे अक्षय खन्ना (Akshaye Khanna) याच्या अभिनयाचं सर्वच कौतुक करत आहेत. अभिनेत्री स्मृती ईराणी यांच्यासह इतरांनी तर अक्षयला ऑस्कर मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
अक्षय खन्नाने धुरंधरसाठी आपला लूक बदलला. आवाजही बदलला. एवढेच नव्हे तर त्याच्या गाण्याच्या स्टेप्सही प्रचंड व्हायरल झाल्या. त्या गाण्यातील त्याचा डान्स, त्या स्टेप्स पाहिल्यानंतर लोकांना त्याचे वडील आणि अभिनेता विनोद खन्ना यांच्या डान्सची आठवण आली, एवढंच नव्हे तर त्यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. अक्षय हा धुरंधरमध्ये हुबेहुब विनोद खन्ना यांच्यासारखाच नाचल्याचं पाहायला मिळालं. अक्षयच्या लोकप्रियतेमुळे त्याचं कुटुंबही चर्चेत आलं आहे. त्याचे भाऊ काय करतात याची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल होताना दिसत आहे.
कोण आहे भाऊ ?
अक्षय खन्नाच्या मोठ्या भावाचे नाव राहुल खन्ना आहे. राहुल सुद्धा अभिनेता आहे. राहुलने व्हिजे, मॉडल आणि रायटर म्हणून कामही केलंय. विनोद खन्ना यांचा सर्वात मोठा मुलगा राहुल खन्ना तर अक्षय छोटा आहे. राहुल खन्नाने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1999 मध्ये केली. अर्थ ही त्याची डेब्यू फिल्म होती. या सिनेमासाठी बेस्ट मेल डेब्यूचा फिल्मफेअर ॲवार्डही त्याला मिळाला होता. 2023 मध्ये लॉस्ट या सिनेमात त्याने काम केलं होतं. त्यानंतर तो कोणत्याही सिनेमात दिसला नाही. 1994 पासून 1998 पर्यंत MTV Asia मध्ये तो व्हिजे म्हणून काम करत होता.
न्यूड फोटोशूटने वाद
राहुल खन्नाने 2022मध्ये इन्स्टाग्रामवर त्याचा न्यूड फोटो शेअर केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. या फोटोमुळे वादही झाला होता. त्याच्यावर टीकाही झाली होती. या फोटोवर मलायका अरोडा, नेहा धुपियापासून दिया मिर्झापर्यंत अनेकांनी कमेंट केल्या होत्या.