Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमारच्या बहिणीच्या नकली सह्या करत फसवणूक ; मनसे नेत्याविरोधात तक्रार दाखल

भाडे करारानुसार गणेश चुक्कल यांना फ्लॅट रिकामा करायचा होता. मात्र चुकल यांनी दावा केला की त्यांनी 3 नव्हे तर 30 वर्षांचा करार केला आहे. मात्र, अलकाच्या वकिलाने असा कोणताही करार केला नसल्याचे म्हटले आहे.

Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमारच्या बहिणीच्या नकली सह्या करत फसवणूक ; मनसे नेत्याविरोधात तक्रार दाखल
Ganesh Chakkal
Image Credit source: Tv9
प्राजक्ता ढेकळे

|

Sep 23, 2022 | 1:50 PM

अक्षय कुमारची बहीण अलका हिरानंदानी (Alka Hiranandani)हिची खोटी सही करत, फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मनसेचे विभागप्रमुख गणेश चुक्कल (Ganesh Chukkal)यांच्याविरुद्ध पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेता अक्षय कुमारची(Akshay Kumar) बहीण अलका हिरानंदानी हिची सही खोटी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

आरोपी गणेश चुक्कल यांना 3 वर्षांसाठी भाड्याने फ्लॅट देण्यात आला होता. मात्र चुकलने बनावट सही करत , बनावट कागदपत्रे तयार करून फ्लॅट 30 वर्षांसाठी भाड्याने दाखवला. त्याच्यावर 2  कोटींहून अधिक भाडे थकीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी अलका हिरानंदानीच्या कंपनीने विक्रोळीतील मनसे नेते गणेश चुक्कल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मात्र गणेश चुक्कल यांनी याप्रकरणी लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गणेश चुक्कल हे मनसेच्या विक्रोळी विभागाचे प्रमुख आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पवई हिरानंदानी येथील एका फ्लॅटशी संबंधित आहे.

काय आहे प्रकरण

गणेशवर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची बहीण अलका हिची सही खोटी केल्याचा आरोप आहे. अक्षय कुमारच्या बहिणीकडे पवईच्या हिरानंदानी भागात एक फ्लॅट आहे, जो गणेश चुक्कलला तीन वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. भाडे करारानुसार गणेश चुक्कल यांना फ्लॅट रिकामा करायचा होता. मात्र चुकल यांनी दावा केला की त्यांनी 3 नव्हे तर 30 वर्षांचा करार केला आहे. मात्र, अलकाच्या वकिलाने असा कोणताही करार केला नसल्याचे म्हटले आहे.

आपण कोणतीही खोटी कागदपत्रे सादर केलेली नाहीत, आपल्यावरील आरोप खोटे असून ते न्यायालयात सिद्ध होतील, असे गणेश चुक्कल यांनी म्हटले आहे. सध्या अलकाच्या तक्रारीनंतर पोलीस पुन्हा एकदा गणेश चुक्कलची चौकशी करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें