AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar | पान मसाल्याच्या जाहिरातीवर अखेर अक्षय कुमारने सोडलं मौन; म्हणाला ‘मी फॅक्ट चेक..’

अक्षय कुमारने जेव्हा पान मसाल्याची जाहिरात केली होती, तेव्हा चाहत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त झाली. या जाहिरातीमुळे अक्षयला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर चाहत्यांची नाराजी लक्षात घेत अक्षयने जाहीर माफी मागितली होती. आता पुन्हा एकदा तो त्याच जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे.

Akshay Kumar | पान मसाल्याच्या जाहिरातीवर अखेर अक्षय कुमारने सोडलं मौन; म्हणाला 'मी फॅक्ट चेक..'
Akshay KumarImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 10, 2023 | 8:20 AM
Share

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : अभिनेता शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यासोबत ‘विमल’ या पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकल्याने अक्षय कुमार पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. गेल्या वर्षी अक्षयने जेव्हा या पान मसाल्याची जाहिरात केली होती, तेव्हा त्याला प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर त्याने जाहिरातीतून माघार घेतली होती. इतकंच नव्हे तर भविष्यात अशा जाहिराती करणार नसल्याचं आश्वासन चाहत्यांना दिलं होतं. म्हणूनच अक्षयला जेव्हा पुन्हा पान मसाल्याच्या जाहिरातीत पाहिलं गेलं, तेव्हा नेटकऱ्यांनी त्याला ‘खोटारडा’ म्हणून ट्रोल केलं. आता या ट्रोलिंगवर अखेर अक्षयने मौन सोडलं आहे. एका वेबसाइटने दिलेलं वृत्त शेअर करत अक्षयने त्या जाहिरातीमागील सत्य सांगितलं आहे.

अक्षय कुमारचं स्पष्टीकरण

एक्सवर (ट्विटर) अक्षयने एका वेबसाइटचं वृत्त शेअर केलं आहे. ‘अक्षय विमल पान मसालासाठी पुन्हा ब्रँड ॲम्बेसेडर बनला’, अशा आशयाचं हे वृत्त होतं. हे वृत्त शेअर करत अक्षयने संबंधित वेबसाइटला आणि त्याला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच फटकारलं आहे. त्याने लिहिलं, ‘परतला, तेसुद्धा ॲम्बेसेडर म्हणून? जर तुम्हाला फेक न्यूजशिवाय इतर गोष्टी जाणून घेण्यात चुकून रस असेल तर तुमच्यासाठी मी फॅक्ट चेक सांगतो. ही जाहिरात 13 ऑक्टोबर 2021 रोजी शूट करण्यात आली होती. त्या जाहिरातीतून माघार घेतल्याचं जाहिरपणे सांगितल्यानंतर माझं त्या ब्रँडशी काही घेणंदेणं नाही. मात्र कायदेशीर बाबींचा विचार करता ते पुढच्या महिन्यापर्यंत ती जाहिरात चालवू शकतात. त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि काही खऱ्या बातम्यांकडे लक्ष द्या.’

गेल्या वर्षीची जाहिरात

गेल्यावर्षी पान मसाल्याच्या जाहिरातीनंतर अक्षयवर खूप टीका झाली होती. या टीकेनंतर त्याने ट्विट करत चाहत्यांची जाहीर माफी मागितली होती. ‘मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि शुभचिंतकांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांपासून तुमच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे मी अस्वस्थ झालोय. मी तंबाखूचं समर्थन करत नाही आणि भविष्यात करणारही नाही. त्यामुळे मी या जाहिरातीतून माघार घेतो. त्यातून मिळालेलं मानधन मी चांगल्या कामासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. कायदेशीर पद्धतीनुसार ब्रँडकडून ती जाहिरात ठरलेल्या वेळेपर्यंत दाखवली जाईल. पण भविष्यात जाहिराती आणि प्रोजेक्ट्सची निवड करताना मी अधिक जाहीर जागरूक राहीन, याचं आश्वासन देतो,’ असं त्याने लिहिलं होतं.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.