‘या़’ अभिनेत्रीला सून बनवण्याचा घेतला निर्णय, तिनेच अक्षय कुमारवर केले गंभीर आरोप

Akshay Kumar | अभिनेता अक्षय कुमार याच्या आयुष्यातील कठीण काळ... आई करत होती लेकाच्या लग्नाचा विचार, पण 'या' अभिनेत्रीने केले अभिनेत्यावर गंभीर आरोप... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खिलाडी कुमारची चर्चा... तेव्हा नक्की काय झालं होतं...

या़ अभिनेत्रीला सून बनवण्याचा घेतला निर्णय, तिनेच अक्षय कुमारवर केले गंभीर आरोप
| Updated on: Mar 20, 2024 | 2:39 PM

मुंबई | 20 मार्च 2024 : अभिनेता अक्षय कुमार कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. आज अक्षय त्याची पत्नी आणि मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा, अक्षय कुमार याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत अभिनेत्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री होती जी आपल्या घराची सून आणि मुलाची पत्नाी व्हावी अशी अक्षयच्या आईची इच्छा होती. पण अभिनेत्याच्या आईची इच्छा कधी पूर्ण होऊ शकली नाही.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा आणि अक्षय यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. फक्त सिनेमांमध्येच नाही तर, खऱ्या आयुष्यातील दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. दोघे एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले होते. पण लग्न होण्याच्या आधीच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

रिपोर्टनुसार, अक्षय कुमार याने शिल्पा हिची फसवणूक केली होती. त्यानंतक खुद्द शिल्पा हिने अक्षय याच्यासोबत नातं तोडल्याचा निर्णय घेतला. अक्षय याच्यासोबत असलेले सर्व संबंध संपवल्यानंतर शिल्पा हिने अभिनेत्यासोबत काम करणं देखील बंद केलं. आज शिल्पा आणि अक्षय यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांच्या नात्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या नात्याबद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या. नात्यात अक्षयने शिल्पाची फसवणूक केली असं देखील अनेकदा समोर आलं… पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल सत्य सांगितलं नाही.

आज शिल्पा आणि अक्षय त्यांच्या खासगी आयुष्यात कुटुंबासोबत आनंदी आहेत. अक्षय याने अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा आणि मुलगी देखील आहे. तर शिल्पा हिने उद्योजक राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केलं. शिल्पा, राज याची दुसरी पत्नी आहे. शिल्पा आणि राज यांना देखील एक मुलगा आणि मुलगी देखील आहे.

सांगायचं झालं तर,  बॉलिवूड कलाकार त्यांचं खासगी आयुष्य स्वतःपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पण सेलिब्रिटींचे असणारे अफेअर कधीही गुपित राहत नाहीत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.