AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलाला सलमान खानने धमाकवलं आणि…, मोठी घटना अखेर समोर

Salman Khan | अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो... बॉलिवूडमध्ये सलमान खान याने अनेक नव्या सेलिब्रिटींना लॉन्च केलं आहे. त्यामुळे अभिनेत्याला 'गॉडफादर' देखील म्हणतात... पण सलमान खानने मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलाला का धमकावलं... याबद्दल मोठं सत्य अनेक दिवसांनंतर समोर आलं आहे...

मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलाला सलमान खानने धमाकवलं आणि..., मोठी घटना अखेर समोर
| Updated on: Mar 20, 2024 | 1:23 PM
Share

मुंबई | 20 मार्च 2024 : अभिनेता सलमान खान आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंच नाहीतर, मिथुन चक्रवर्ती आणि सलमान खान यांच्यातील नातं देखील सर्वांना माहिती आहे… मिथुन चक्रवर्ती यांनी अनेकदा सांगितलं आहे की, सलमान खान माझ्या कुटुंबाचा भाग आहे. दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याने एक मजेदार किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सलमान खानने कशा प्रकारे सर्वांसमोर धमकावलं होतं याबद्दल नमाशी याने सांगितलं आहे. सध्या सर्वत्र नमाशी आणि सलमान यांची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नमाशी म्हणाला, ‘सलमान भाई तेव्हा ‘राधे’ सिनेमाची शुटिंग करत होता. मी देखील ‘बॅड बॉय’ सिनेमाची शुटिंग पूर्ण केली होती. मी सलमान भाईला भेटण्यासाठी मेहबूब स्टुडिओमध्ये गेलो. मी तेथे गेलो समोर सलमान भाई उभा होता… मी त्याच्या समोर गेलो आणि त्याच्या पाया पडलो…’ पुढे झालेले विनोद सांगत नमाशी म्हणाला, ‘मला त्याने धमकी दिली…’

‘सलमान भाई मला म्हणला, सर्वांत आधी येथून निघ… मी तुझ्या इतकाच वृद्ध आहे, माझ्यासोबत असं काहीही करु नकोस… जर तू पुन्हा असं केलंस, विशेषतः दिशा पटानी याठिकाणी असताना, तर तुला मी सेटच्या बाहेर फेकून देईल…’ सध्या सर्वत्र नमाशी आणि सलमान यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.

पुढे नमाशी म्हणाला, ‘सलमान भाई मला भेटला आणि म्हणाला पुढे कधीही तुला मला भेटायचं असेल, तर एक नियम पाळावा लागेलच आणि तो नियम म्हणजे सलमान खानच्या कधीही पाया पडायचं नाही…’ असं देखील नमाशी म्हणाला.

नमाशी याच्याबद्दल सांगायचं झालं तर, नमाशी याने 2023 मध्ये ‘बॅड बॉय’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. आता नमाशी बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट यांच्यासोबत नव्या सिनेमात काम करत आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्यानंतर आणि त्यांचा मुलगा नमाशी याला देखील चाहते मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा