
बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांचे अफेअर आणि ब्रेकअप सर्वांत जास्त चर्चेत राहिले आहेत. त्यातील एक कपल म्हणजे अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी. यांच्या अफेअरची बॉलीवूड वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. 1990 च्या दशकात तर या कपलबद्दल अनेक बातम्या चर्चेत असायच्या. त्यांच्या नात्याची मीडियामध्ये बरीच चर्चा असायची. एवढंच नाही तर ही दोघे लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र काहीच दिवसात त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या.
या जोडीचा ब्रेकअप होण्यामागे तशी बरीच कारणे सांगितली. पण एका मुलाखतीद्वारे अक्षय कुमारसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले निर्माते सुनील दर्शन यांनी अक्षय आणि शिल्पा एकेकाळी लग्नाचा गंभीरपणे विचार करत होते. पण त्यांचे नाते असेच का तुटले हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ज्योतिषाने केली होती भविष्यवाणी
एका मुलाखतीत सुनील यांनी अक्षय आणि शिल्पाच्या मागील नात्याबद्दल सांगितले, त्यांनी या जोडीला “सुंदर जोडपे” म्हटले,. परंतु “नशिबाचे स्वतःचे नियोजन असते” असेही ते म्हणाले. त्यांनी हे देखील सांगितले की काही वर्षांपूर्वी ट्विंकल खन्नाचे वडील राजेश खन्ना यांच्या जवळच्या एका ज्योतिषाने अक्षय आणि ट्विंकल एके दिवशी लग्न करतील अशी धक्कादायक भविष्यवाणी केली होती याबद्दलही खुलासा केला होता. त्यावेळी सुनीलने कबूल केले की त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही, कारण त्यांच्या मते ट्विंकल आणि अक्षयचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता.
अक्षयचे शिल्पासोबतचे नाते का तुटले ?
सुनील याबद्दल सांगताना म्हणाले, “हा योगायोग आहे. जर शिल्पाच्या पालकांनी काही अटी घातल्या होत्या. त्या अटींमुळे त्यांचे नाते बिघडले अन्यथा त्यांच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले असते.” त्या अटींबद्दल विचारले असता, सुनील म्हणाले, “पालक म्हणून, त्यांच्या मुलीचे रक्षण करण्याची इच्छा असणे काहीच चुकीचे नाही.”
शिल्पाच्या पालकांनी काही अटी घातल्या होत्या.
आर्थिक सुरक्षिततेचा विचार सुनीलला विचारला असता, त्याने उत्तर दिले, “सर्व प्रकारची सुरक्षितता, सर्व पालकांना तीच हवी असते.” तो पुढे म्हणाला की तो शिल्पाच्या पालकत्वाच्या शैलीशी पूर्णपणे सहमत नाही, तो म्हणाला, “मला वाटले की पालकांच्या बाजूने ते चुकीचे आहे. ते असायला हवे नव्हते. चला त्याकडे त्या पद्धतीने पाहूया.”
ब्रेकअपनंतर अक्षय कुमारचे मन दुखावले होते का?
‘एक रिश्ता’च्या शूटिंगच्या काही काळापूर्वीच शिल्पा आणि अक्षयचे ब्रेकअप झाले. त्यावेळची आठवण करून देताना, जेव्हा सुनीलला विचारण्यात आले की अक्षयचे मन दुखावले होते का, तेव्हा त्याने उत्तर दिले, “त्याचे मन दुखावले नव्हते. मला वाटलं की तो चांगले काम करत आहे. तो पुनरागमन करत आहे.” तो त्याच्या कामात खूप व्यस्त होता, त्याच वेळी त्याने अनेक चित्रपटांचे व्यवस्थापन केले होते, धडकन, हेरा फेरी आणि एक रिश्ता.
आयुष्यातील एक नवीन अध्याय
2001 मध्ये, अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासोबत लग्न करून त्याच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू केला आणि आता ते दोघेही आता चांगले वैवाहिक जीवन जगत आहे. काही वर्षांनंतर, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी लग्न केले.