अक्षय कुमार याची पत्नी 50 व्या वर्षी देणार बाळाला जन्म?, ट्विंकल खन्ना हिने गर्भवती…

Twinkle Khanna Pregnancy : अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. मात्र, काही वर्षांपासून ट्विंकल खन्ना ही चित्रपटांपासून दूर आहे. ट्विंकल खन्ना चित्रपटांपासून जरी दूर असली तरीही ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ट्विंकल खन्ना दिसते.

अक्षय कुमार याची पत्नी 50 व्या वर्षी देणार बाळाला जन्म?, ट्विंकल खन्ना हिने गर्भवती...
Twinkle Khanna and Akshay Kumar
| Updated on: Jul 24, 2024 | 12:30 PM

अक्षय कुमार याची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ट्विंकल खन्नाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. ट्विंकल खन्ना ही काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. मागील काही वर्षे ट्विंकल खन्ना ही विदेशात शिक्षण घेताना देखील दिसली. ट्विंकल खन्ना हिने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट कायमच चर्चेत असते. आता नुकताच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ट्विंकल खन्ना तूफान चर्चेत आलीये.

ट्विंकल खन्ना हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये हातात चहा मग घेऊन गंभीर विचार करताना ट्विंकल खन्ना ही दिसतंय. पीरियड्स (मासिक पाळी) आली नसल्याने ट्विंकल खन्ना तणावात आहे. गर्भवती असल्याने तर आपल्याला पीरियड्स आले नाहीत ना? की मेनोपोज टप्प्यात असल्याने पीरियड्स आले नाहीत, याचा विचार ट्विंकल खन्ना करत आहे.

ट्विंकल खन्नाने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी 50 वर्षांची झाली आहे. पण मी पॅनिक होत आहे. मी काय पेरीमेनोपोज क्लबमध्ये सहभागी होणार आहे का? तुम्ही लोक मला मेनोपोज टप्प्यातील तुमचा अनुभव शेअर करा, तुमचेही पीरियड्स मिस झाल्यावर तुमच्याही मनात असेच विचार येतात का?, जसे माझ्या मनात येत आहेत, असेही ट्विंकल खन्ना हिने म्हटले आहे.

आता ट्विंकल खन्ना हिने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. काही लोकांनी ट्विंकल खन्नाला सल्ला दिलाय तर काहीजण हे ट्विंकल खन्नाची मजाक उडवताना देखील दिसत आहेत. ट्विंकल खन्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. ट्विंकल खन्नाच्या या व्हिडीओनंतर विविध चर्चा या जोरदार रंगताना दिसत आहेत.

अनेकांनी अक्षय कुमार हा तिसऱ्यांदा बाप होणार असल्याचे म्हटले. ट्विंकल खन्ना ही खरोखरच 50 व्या वर्षी बाळाला जन्म देणार का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांना एक मुलगा आणि मुलगी आहेत. काही दिवसांपूर्वीच ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार हे एअरपोर्टला स्पॉट झाले. यावेळी ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार हे फोटोसाठी खास पोझ देताना देखील दिसले.