Dhurandhar: ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाच्या धमाकेदार एंट्रीवाल्या म्यूजिकमागे कोणाचा आवाज?

Dhurandhar: ‘धुरंधर’ सिनेमातील अक्षय खन्नाच्या एंट्रीचा ट्रॅक सध्या खूप हिट होत आहे. हा ट्रॅक बहरीनचे गाणे आहे, ज्याचे नाव Fa9la आहे. आता या म्यूझिकमागे कोणाचा आवाजा आहे चला जाणून घ्या..

Dhurandhar: ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाच्या धमाकेदार एंट्रीवाल्या म्यूजिकमागे कोणाचा आवाज?
Akshay Khanna
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 13, 2025 | 3:43 PM

‘धुरंधर’ चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे, तर अक्षय खन्नाचा एंट्री सीन आणि एंट्री ट्रॅकचा वेगळाच फॅन बेस तयार झाला आहे. सोशल मीडियावर सर्वत्र अक्षय खन्ना आणि एंट्री ट्रॅकची चर्चा आहे. सोशल मीडियावर हे ट्रॅक ट्रेंड होत आहे आणि लोक त्यावर खूप नाचत आहेत. खरे तर अक्षय खन्ना चित्रपटात पाकिस्तानमधील रहमान डकैतच्या भूमिकेत आहेत. त्याच्या एण्ट्रीला जो म्यूझिक ट्रॅक वापरण्यात आला आहे त्याने पूर्ण भारतात धुमाकूळ घातला आहे. ते एक बहरीनचे गाणे आहे.

हे गाणे जे सध्या अक्षय खन्नाच्या एंट्री ट्रॅकच्या नावाने प्रसिद्ध होत आहे ते बहरीनचे आहे. या रॅपचे नाव Fa9la आहे. हे गाणे बहरीनच्या रॅपर फ्लिपराचीने बहरीनी भाषेत गायले आहे. रहमान डकैतची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाच्या आयकॉनिक एंट्रीसोबत या गाण्याने कमाल केली आहे. हे गाणे बहरीनच्या रॅपर फ्लिपराची उर्फ हुस्साम असीम यांनी गायले आहे आणि भारतात सुपर-डुपर हिट झाल्यानंतर ते खूप चर्चेत आले आहेत. रॅपर फ्लिपराचीने खरे नाव हुस्साम असीम असे आहे.

चांगली फॅन फॉलोइंग

खाडी क्षेत्रात फ्लिपराची खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळते. याआधीही अरबी हिप-हॉपच्या चाहत्यांमध्ये ते खूप व्हायरल झाले होते. फ्लिपराचीला खाडी क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या रॅपर्सपैकी एक मानले जाते, जो खलीजी-स्टाइल रॅप बनवतो. फ्लिपराचीचे गाणे Fa9la हे एक खलीजी रॅप आहे (अशा प्रकारच्या रॅपमध्ये जुनी अरबी वाद्ये नव्या युगातील हिप-हॉप बीट्ससोबत मिसळली जातात)

हे रॅप कधी बनवले?

फ्लिपराचीने Fa9la गाणे २०२४ मध्ये रिलीज केले होते. बॉलिवूड संगीतकार शाश्वत सचदेव यांनी हे गाणे ‘धुरंधर’मध्ये वापरले आहे. अक्षय खन्नाच्या एंट्री सीनचे जिथे ते चित्रपटातील व्हिलन म्हणून दिसतात ते बॅकग्राउंड ट्रॅक बनवले. एका रिपोर्टनुसार, बहरीनी रॅपरला १२ वर्षांच्या वयापासूनच संगीताची आवड होती. टीनएजपासूनच त्यांनी रॅप करायला सुरुवात केली होती. अनेक क्षेत्रीय आणि ग्लोबल कलाकारांसोबत काम केल्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये आपला पहिला स्टुडिओ अल्बम Straight Out Of 2 Seas रिलीज केला. यातील ट्रॅक We So Fly हिट ठरला.