AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Bhatt | आलियाच्या लग्नाला महेश भट्ट यांचा का होता विरोध? अभिनेत्रीला बाथरुममध्ये बंद केलं आणि…

रणबीर कपूर याच्यासोबत लग्न करण्याआधी कसं होतं आलिया भट्ट् हिच्या घरातील वातावरण; लेकीच्या लग्नाला विरोध असलेल्या महेश भट्ट यांनी का केल होतं आलियाला बाथरुममध्ये बंद?

Alia Bhatt | आलियाच्या लग्नाला महेश भट्ट यांचा का होता विरोध? अभिनेत्रीला बाथरुममध्ये बंद केलं आणि...
| Updated on: Jun 07, 2023 | 10:47 AM
Share

मुंबई | ‘स्टूडंट ऑफ द ईयर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्ट हिने फार कमी कालावधीत झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. ‘उडता पंजाब’, ‘राझी’, ‘डार्लिंग्स’, ‘डिअर झिंदगी’, ‘गली बॉय’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आलियाने ‘गंगूबाई काठियावडी’ पर्यंतचा यशस्वी प्रवास केला. अभिनेत्रीच्या प्रवासात अनेकांनी तिला साथ दिली, तर चाहत्यांनी भरभरुन प्रेम. आलिया भट्ट आल बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. यशाच्या शिखरावर चढत असताना आलियाचं अनेक अभिनेत्यांसोबत नाव देखील जोडण्यात आलं. आता आलिया तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. पण आलियाने लग्न करावं अशी अभिनेत्रीचे वडील महेश भट्ट यांची इच्छा नव्हती.

एका मुलाखती खुद्द आलियाने तिच्या वडिलांच्या इच्छेबद्दल सांगितलं होतं. महेश भट्ट यांनी आलियाला धमकावलं होतं आणि म्हणाले होते, आलिया आणि शाहिन यांना बाथरुममध्ये बंद करेल आणि डोळ्यासमोरून जावू देणार नाही.. सध्या सर्वत्र आलियाने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

आलिया म्हणाली होती, ‘माझ्या वडिलांनी सांगितलं होतं तुम्ही कुठेही जावू शकत नाही. मी तुम्हाला लॉक करुन ठेवेल.. ते प्रामाणिक होते आणि बोलायचे, तुमचं लग्न झालेलं मी पाहू शकत नाही. ते फक्त असं बोलत नव्हते, त्यांनी केलं देखील असतं… आमची खूप काळजी करतात आणि आमच्या लग्नाला त्यांचा विरोध होता..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली..

आलिया कायम खास निमित्ताने वडील महेश भट्ट आणि आई सोनी राजदान यांच्यासोबत फोटो पोस्ट करत असते. शिवाय बहीण शाहिन हिच्यावर देखील आलिया प्रचंड प्रेम करते. आलियाने गेल्यावर्षी अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर आलिया गोंडस मुलीला देखील जन्म दिला. पण कपूर कुटुंबाच्या लेकीचा फोटो अद्याप समोर आलेला नाही. आलिया – रणबीर यांनी लेकीसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट हिने ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर खास अंदाजात आलिया आणि रणबीर यांनी लेकीचं नाव राहा कपूर ठेवलं. लेकीच्या जन्मानंतर अनेक ठिकाणी आलिया आणि रणबीर त्यांच्या लेकीबद्दल बोलत असतात.

आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिल २०२२ मध्ये आलिया आणि रणबीर यांनी लग्न केलं. ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यानंतर लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आई होणार असल्याची माहिती दिली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?