लेकीला जन्म दिल्यानंतर आलिया म्हणते, ‘माझ्या शरीरात अनेक बदल झाले आहेत, पण… ‘

आई झाल्यानंतर इतर मातांसाठी आलियाचा पुढाकार; 'या' गोष्टी न करण्याचा महिलांना दिला सल्ला

लेकीला जन्म दिल्यानंतर आलिया म्हणते, माझ्या शरीरात अनेक बदल झाले आहेत, पण...
Alia Bhatt
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 13, 2023 | 2:53 PM

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) यांच्यासाठी २०२२ हे वर्ष अत्यंत खास होतं. कारण गेल्या वर्षी आलिया आणि रणबीरने लग्न केलं आणि नोव्हेंबर महिन्यात आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. आई झाल्यानंतर आलियाने पुन्हा वर्कआऊटला सुरुवात केली आहे. राहाच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी आलियाने पुन्ही स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्यासा सुरुवात केली आहे. ‘प्रग्नेंसीमुळे माझ्या शरीरात अनेक बदल झाले आहेत, पण आता मी वर्कआऊट करत आहे…’ असं आलिया म्हणाली. (alia kapoor daugher)

आलिया वर्कआऊटचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी आलिया इतर महिलांना देखील फिटनेसबद्दल टिप्स दिल्या आहेत. आलियाने सांगितलं, ‘जवळपास २ आठवडे व्यायम केला नाही. या दरम्यान मी फक्त चालले…’ पण आता आलियाने योगा करण्यास सुरुवात केली आहे.

 

 

पुढे आलिया म्हणाली, ‘प्रत्येकाचं शरीर सारखं नसतं. त्यामुळे कोणताही व्यायम प्रकार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःच्या फटनेस कडे लक्ष द्या.’ अलिया प्रेग्नेंसीनंतर सतत तिच्या जीवनात झालेल्या बदलांमुळे चर्चेत असते. (alia bhatt pregnancy news)

एका मुलाखतीत आलियाने तिच्या आयुष्यातील मोठ्या निर्णयांबद्दल सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, ‘जर आई झाल्यानंतर माझ्या कामावर फरक पडणार असेल, तर मला त्याबद्दल काहीही हरकत नाही. माझं करियन यशाच्या उच्च शिखरावर असताना मी लग्न केलं आई झाले.. कोण म्हणतं लग्न आणि आई झाल्यानंतर, त्याचा परिणाम करियरवर होतो.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आई झाल्यानंतर अनेक बदल झाले. आई झाल्यानंतर माझ्या कामावर त्याचा परिणाम होत असेल, तर मला काही हरकत नाही. आई होणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय होता.’ असं देखील आलिया म्हणाली.

आलियाने आई झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर अभिनेत्रीने लेकीच्या नावाची घोषणा देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. पण आतापर्यंत अभिनेत्रीने लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही.