Ranbir Kapoor: आधी जीभ घसरली, रणबीर कपूरचा माफीनामा; आता पत्नी आलिया भट्टची कृती चर्चेत
‘रामायण’ चित्रपटाच्या भूमिकेमुळे आणि या वक्तव्यामुळे रणबीर पुन्हा चर्चेत आला आहे. एका चुकीच्या शब्दप्रयोगावरून सुरू झालेली चर्चा आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचली आहे. सोशल मीडियावरील प्रतिक्रियांदरम्यान रणबीरने माफी मागून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Ranbir Kapoor: अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रचारादरम्यान दसऱ्याच्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल झाला. या प्रकरणानंतर रणबीरची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्ट हिने त्याला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. रणबीरच्या समर्थनार्थ शेअर करण्यात आलेल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीला आलियाने लाइक केलं आहे. त्यामुळे तिच्या या कृतीकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
नेमकं काय म्हणाला होता रणबीर कपूर?
20 ऑक्टोबर रोजी कोलकाता इथं दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात रणबीर कपूर सहभागी झाला होता. यावेळी तो सत्य आणि चांगुलपणाचा विजय या दसऱ्याच्या संदेशाबद्दल बोलत होता. मात्र, बोलताना त्याच्या तोंडून एक शब्द चुकून निघाला. ‘वाईट कितीही शक्तिशाली असलं, तरी शेवटी सत्य आणि चांगुलपणाचा अंत होईल,’ अशा अर्थाचं वाक्य त्याने म्हटलं. प्रत्यक्षात त्याला सत्य आणि चांगुलपणाचा विजय होईल, असं म्हणायचं होतं. ‘जीत’ऐवजी ‘अंत’ हा शब्द वापरल्याने त्याच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.
विशेष म्हणजे, रणबीर आगामी ‘रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे त्याच्या या चुकीच्या शब्दप्रयोगाची तुलना चित्रपटातील भूमिकेशी करत अनेकांनी त्याला ट्रोल केलं. काही नेटकऱ्यांनी त्याच्या वक्तव्यावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी चित्रपटाच्या प्रचारादरम्यान अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं म्हटलं.
पहा पोस्ट-
🚨 ALIA BHATT JUST VIEWED THIS STORY 👀
Ranbir Kapoor reportedly attended the Kolkata event despite an assassination threat and a moment of hesitation during his speech turned into online trolling that eventually led to an apology.
HE WAS THERE STANDING ON AN OPEN STAGE DESPITE THE SECURITY CONCERNS. Could anyone blame him for stumbling over a word under such circumstances?
Criticism is one thing but all should keep Empathy.
#RanbirKapoor #AliaBhatt #Ramayana
— Pan India Review (@PanIndiaReview) October 22, 2026
रणबीरने मागितली जाहीर माफी
सोशल मीडियावरील टीकेनंतर रणबीरने 21 ऑक्टोबर रोजी चेन्नई इथं झालेल्या ‘रामायण’च्या कार्यक्रमात या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिलं. बोलताना आपली जीभ घसरल्याचं त्याने मान्य केलं आणि आपल्या शब्दांमुळे गैरसमज झाल्याबद्दल माफी मागितली. ‘वाईट कितीही शक्तिशाली असलं, तरी शेवटी सत्य आणि चांगुलपणाचाच विजय होतो,’ असं म्हणायचं होतं, असं त्याने स्पष्ट केलं. यावेळी रणबीरने ‘रॉकस्टार’ चित्रपटातील गाण्याचाही संदर्भ दिला. ‘जो भी मैं कहना चाहूं, बर्बाद करे अल्फाज मेरे’ या ओळीचा उल्लेख करत त्याने आपल्या शब्दांमुळे गोंधळ निर्माण झाल्याचं सांगितलं.
या संपूर्ण वादादरम्यान आलिया भट्टने रणबीरच्या समर्थनार्थ एका फॅनपेजवर शेअर करण्यात आलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीला लाइक केलं आहे. या पोस्टमध्ये रणबीरवर टीका करणाऱ्यांना त्याची परिस्थिती समजून घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. कोलकात्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागे संभाव्य सुरक्षेच्या चिंतेची पार्श्वभूमी असल्याचाही त्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता. त्यामुळे रणबीरचं समर्थन करणाऱ्या या पोस्टला लाइक करत आलियाने अप्रत्यक्षपणे तिची भूमिका मांडल्याचं म्हटलं जात आहे.
