
काही महिन्यांपूर्वी अमाल मलिक आपल्या कुटुंबाशी नातं तोडण्याच्या कारणामुळे चर्चेत होता. त्याने एक पोस्ट शेअर करून सांगितलं होतं की तो आई-वडील आणि भाऊ यांच्यामुळे कुटुंबाशी नातं तोडत आहेत. मात्र, ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही वेळातच त्याने ती डिलीट केली होती. आपलं वैयक्तिक आयुष्य नेहमी लाइमलाइटपासून दूर ठेवणारा सिंगर आणि म्युझिक कंपोजर अमाल मलिक याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने वक्तव्य केले.
सिद्धार्थ कननशी बोलताना अमाल मलिक म्हणाला की, तो एका मुलीशी 5 वर्षे नात्यात होता. पण तिने फक्त त्याच्या मुस्लिम धर्मामुळे त्याला सोडलं. सिंगर म्हणाला की, त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या कुटुंबाला त्यांच्या नात्याबाबत नेहमीच अडचण होती. म्हणून तिने मला सोडून दिले.
5 वर्षे नात्यात होता सिंगर
अमाल मलिक म्हणाला की, तो 2014 ते 2019 या काळात त्या मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. पण तिच्या कुटुंबाला ती चित्रपटसृष्टीशी संबंधित कोणालाही डेट करावे हे मान्य नव्हतं. तिच्या कुटुंबाने आम्हाला कधीच स्वीकारलं नाही.
तिने पळून जाण्यास दिला होता होकार
तो पुढे म्हणाले, “मी त्या वेळी ‘कबीर सिंह’ चित्रपटातील ‘पहला प्यार’ गाण्यावर काम करत होतो आणि त्याचदरम्यान माझं ब्रेकअप झालं. एके दिवशी तिने फोन केला आणि सांगितलं की तिचं लग्न ठरलं आहे. तिने मला सांगितलं की, जर मी सांगितलं तर ती माझ्यासोबत पळून जाईल, पण त्या वेळी माझ्या मनात ‘DDLJ’ चा SRK जागा झाला. मी तिला सांगितलं की, जर तुझ्या पालकांना माझ्या कामाचा आणि माझ्या धर्माचा आदर करता येत नसेल, तर मी तुला तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”