AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambani Family : अंबानी कुटुंबाला या गायिकेच्या आवाजाची भुरळ, ईशा-अनंत अंबानीकडून भरभरून कौतुक

अंबानींच्या अँटिलियातील गणेशोत्सवात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यादरम्यान अनंत आणि ईशा अंबानींनी एका गायिकेच्या आवाजाचं आणि गायनाचं भरभरून कौतुक केलं.

Ambani Family : अंबानी कुटुंबाला या गायिकेच्या आवाजाची भुरळ,  ईशा-अनंत अंबानीकडून भरभरून कौतुक
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 17, 2026 | 2:26 PM
Share

अब्जाधीश अंबानी कुटुंबियांच्या (Ambani Family) घरचा गणेशोत्सव मुंबईत अँटिलिया येथे धूमधडाक्यात पार पडला. अँटिलियात गणरायाच्या स्वागतासाठी अंबानी कुटुंबातील सदस्यांसोबतच अनेक मान्यवर व्यक्ती तसे बॉलिवूडमधील अनेक कलाकारही उपस्थित होते. या भव्य समारंभात युवा गायिका आणि बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर याही हजर होत्या, त्यांच्या उपस्थितीने अनेकांचं लक्ष वेधलं गेलं. त्या फक्त अंबानी कुटुंबाला भेटल्याच नाहीत तर एका खास संवादा दरम्यान ईशा आणि अनंत अंबानी यांनी गायिका मैथिली ठाकूर याचं भरभरून कौतुकल केलं. सोशल मीडियावर काही व्हिडीओ समोर आले असून त्यामध्ये मैथिली ठाकूर या अंबानी कुटुंबातील सदस्यांशी बोलताना, संवाद साधताना दिसल्या. मैथिली यांचं बोलणं अनेकांना आवडलं. अंबानी कुटुंबियांना मैथिली यांच गायन, त्यांचा आवाज खूप आवडतो, अनंत आणि ईशा अंबानी या दोघांनी हे आवर्जून नमूद केलं.

मैथिली ठाकूर यांनी गाठलं अँटिलिया

गणेश चतुर्थीच्या दिवशी मैथिली ठाकूर मुंबईत पोहोचल्या आणि त्या अंबानी कुटुंबियांच्या गणेशोत्सवात सहभागी झाल्या. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुंबई यात्रा आणि अंबानी कुटुंबियांच्या घरातील समारभाचे काही फोटो तसेच व्हिडीओ शेअर केले. अँटिलियात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात पारंपारिक पद्धतीने गणरायाचं स्वागत करण्यात आलं. घरचे लोक, नातेवाईक, मित्रमंडळी आणि काही मान्यवर या समारभंला आवर्जून उपस्थित होते. मैथिली ठाकूर यांची नीता अंबानी यांच्याशी भेट झाली, त्यांनी त्यांचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं.

मैथिली खूप चांगल्या आहेत, अनंत अंबानी यांनी केलं कौतुक

याच सोहळ्यादरम्यान मैथिली यांची अनंत अंबानींशी भेट झाली. एक व्हिडीओ समोर आला असून त्या दोघांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यात दिसले. तिथे गप्पा मारत असताना अनंत यांनी मैथिलीचं कौतुक केलं. त्या खूप चांगल्या आहेत, असं ते म्हणाले. त्यावर उत्तर देताना मैथिली म्हणाल्या, अनंत भाई देखील बऱ्याचदा घरच्या कार्यक्रमांचं निमंत्रण देत असतात. याचदरम्यान अनंत यांनी मैथिली यांच्या गायनकीचंही कौतुक केलं. त्यांच्या आवाजात आनंद आणि भक्ति आहे, त्यांच्यावर देवाची कृपा आहे, असं ते म्हणाले. मैथिली यांच्या गायनात भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे धार्मिक आणि भक्ति संगीताशी निगडीत त्यांच्या गाण्यांना लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतो.

ईशा अंबानीलाही आवडतं मैथिली यांचं गाणं

अँटिलियातील सोहळ्यादरम्यान मैथिली यांची अंबानी कुटुंबाची लेक, ईशा अंबानी हिच्याशीही भेट झाली, त्यांच्याही संवादाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. मला आणि माझ्या कुटुंबियांना तुमचं संगीत खूप आवडतं, असं ईशाने मैथिली यांना सांगितलं. माझी मुलंही बऱ्याचदा तुमची गाणी ऐकत असतात, असंही ईशाने आवर्जून नमूद केलं. यावेळी ईशाने त्यांच्या मुलीचीही मैथिली यांच्याशी ओळख करून दिली. ईशाचं बोलणं ऐकून मैथिली खूप खुश झाल्या आणि त्यांनी आभार मानले.

अंबानी कुटुंबियांच्याया सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकारणी, अनेक मान्यवर उपस्थित होते. अभिनेत्री कतरिना कैफ, विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी, जान्हवी कपूर, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर, आलिया भट्ट, आणि सचिन तेंडुलकर सह अनेक पाहुणे या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते, त्यांनी गणरायाचे आशीर्वाद घेतले.

Follow Us
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक