7 वर्ष लहान रणबीर कपूर सोबत ‘प्रेमसंबंध’, अनेक वर्षांनंतर अमीषा म्हणाली, ‘आम्ही दोघांनी एकत्र…’

Ameesha Patel on Relationship with Ranbir Kapoor: 'आम्ही दोघांनी एकत्र...', रणबीर कपूर याच्या गर्लफ्रेंडच्या यादीत अमीषा पटेल, अनेक वर्षांनंतर रिलेशनशिपवर अभिनेत्रीने सोडलं मौन... सध्या सर्वत्र अमीषाच्या वक्तव्याची चर्चा...

7 वर्ष लहान रणबीर कपूर सोबत प्रेमसंबंध, अनेक वर्षांनंतर अमीषा म्हणाली, आम्ही दोघांनी एकत्र...
फाईल फोटो
| Updated on: Apr 30, 2025 | 11:21 AM

Ameesha Patel on Relationship with Ranbir Kapoor: एक काळ असा होता जेव्हा अभिनेता रणबीर कपूर त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, गर्लफ्रेंड्सच्या यादीवरून चर्चेत असायचा. रणबीरच्या नावाची चर्चा अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींसोबत झाली. अभिनेत्री अमीषा पटेल हिच्यासोबत देखील रणबीर रिलेशनशिपमध्ये होता असं अनेकदा सांगण्यात आलं. यावर आता खुद्द अमीषा हिने मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमीषा पटेल हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अमीषा पटेल हिने स्पष्ट केलं आहे की, दोघांमध्ये कधीच रोमँटिक रिलेशन नव्हतं. ‘एक वेळ अशी होती जेव्हा अम्हाला एकत्र अनेकदा स्पॉट करण्यात आलं आहे. जवळपास एक वर्ष आम्ही एकत्र पार्टी केली आहे. कधी रणधीर कपूर यांच्या घरी तर कधी आरके स्टुडिओजमध्ये काम केलं आहे.’

‘फार अचानक असं व्हायचं. त्यामुळे आमच्या दोघांचे फोटो देखील समोर यायचे. तेव्हा मी प्रसिद्ध अभिनेत्री देखील होती. सैफ अली खान याच्यासोबत देखील ‘रेस’ सिनेमाच्या वेळी आम्ही एकत्र पार्टी केलेली. आमचे कुटुंबिय देखील फार जुने मित्र आहे. पण रणबीर आणि माझ्यात असं काहीही नव्हतं.’ असं अमीषा पटेल म्हणाली आहे.

अमीषा पटेल आज बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री अमिषा पटेल हिने 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कहो ना प्यार है’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. अमिषाच्या करियरची सुरुवात उत्तम झाली. ‘कहो ना प्यार’ सिनेमानंतर अभिनेत्रीचा ‘गदर : एक प्रेम कथा’ सिनेमा हीट ठरला.

पहिल्या दोन सिनेमांमुळे प्रसिद्धीझोतात येताच अमिषा हिच्या खासगी आयुष्या चर्चा देखील जोर धरू लागल्या. पण वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्री अविवाहित आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं होतं.

रणबीर कपूर याच्याबद्दल सांगायचं  झालं तर, अभिनेत्याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. पण रणबीर त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यापेक्षा अधिक चर्चेत असतो. अभिनेत्री आलिया भट्ट हिला अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर आलिया आणि रणबीर यांनी लेक राहा हिचं स्वागत केलं.