
बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल तिच्या सौंदर्यासाठी, अभिनयासाठी ओळखली जाते. पण ती स्पष्टवक्ती म्हणूनही ओळखली जाते. कहो ना प्यार है आणि गदर सारख्या चित्रपटांमधून लोकांची मने जिंकणारी अमिषा पटेल आजही सिंगलच आहे. तिला वयाच्या 50 व्या वर्षी देखील खऱ्या प्रेमाचा शोध आहे. तसचे तिला नात्यांमध्ये मिळालेल्या विश्वासघातांबद्दलही ती बोलली आहे.
तुटलेल्या नात्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
तिने अनेकदा तिच्या तुटलेल्या नात्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. अमिषा पटेलला एक अभिनेता एवढा आवडतो की ती त्याच्यासाठी तिचे तत्व देखील मोडायला तयार आहे. एवढंच नाही तर अमिषाला हा अभिनेता एवढा आवडतो की तिला त्याच्यासोबत ‘वन-नाईट स्टँड’ करण्याची इच्छा आहे. हे तिने स्वत: एका मुलाखतीत सांगितले आहे. हा अभिनेता तिच्यासाठी तिचा क्रश, प्रेम आहे. ती त्याच्यासाठी वेडी असल्याचंही तिने सांगितलं.
तिच्या रुममध्ये नेहमीच त्या अभिनेत्याचेच पोस्टर्स असतात.
हा अभिनेता म्हणजे हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझ. तिने त्याच्याबद्दलचे तिचे प्रेम वारंवार व्यक्त केले आहे. पन्नाशीतही अविवाहित असलेली अमिषा म्हणाली की तिला लहानपणापासूनच टॉम क्रूझवर क्रश आहे आणि तिच्या रुममध्ये नेहमीच त्याचे पोस्टर्स असतात. अलीकडेच एका पॉडकास्टवर, अमिषाने टॉम क्रूझसोबतच्या तिच्या वन-नाईट स्टँडबद्दल स्पष्टपणे सांगितले.
अमिषा टॉम क्रूझसाठी काहीही करायला तयार आहे?
अमिषाने सांगितले की ती लहानपणापासूनच टॉम क्रूझची चाहती आहे. तिच्या आयुष्यात काही तत्त्वे असली तरी ती टॉम क्रूझसाठी ती सर्व तत्त्वे मोडेल. अमिषाने विनोदाने म्हटले होते की ती त्याच्यासोबत वन-नाईट स्टँड करण्यास मागेपुढे पाहणार नाही. अमिषाने यापूर्वी टॉम क्रूझबद्दल तिचे प्रेम व्यक्त केले आहे. 2003 मध्ये एका कार्यक्रमात अमिषाने म्हटले होते की जर तिला कोणत्याही अभिनेत्यासोबत आयुष्य घालवायचे असेल तर टॉम क्रूझ हे पहिले नाव मनात येईल. अमिषाने असेही म्हटले होते की जर नशिबाने तिला साथ दिली तर ती हॉलिवूड स्टारशी लग्न देखील करू शकते.
पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले
पॉडकास्टमध्ये अमिषाने तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल आणि करिअरबद्दलही सविस्तरपणे सांगितले. तिने सांगितले की तिचे पहिले प्रेम करिअर होण्यापूर्वीच घडले होते आणि तेवढ्याच लवकर संपले. अमिषाने हृतिक रोशनसोबत ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून पदार्पण केले. ‘कहो ना प्यार है’ आणि ‘गदर एक प्रेम कथा’ व्यतिरिक्त, अमिषाने ‘हमराझ’ आणि ‘भूल भुलैया’ सारख्या हिट चित्रपटांमध्येही काम केले आहे. अलीकडेच, अमिषा ‘गदर 2’ मध्ये देखील तिच्या सकीना या भूमिकेची झलक दाखवली.