AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बागबान’ सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा नातू जगतोय असं आयुष्य, व्हिडीओ व्हायरल

Baghban Film Child Actor | 'बागबान' सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा नातू म्हणजे यश पाठक आता करतो तरी काय? जगतोय असं आयुष्य... व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त यश पाठक याची चर्चा... सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल...

'बागबान' सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा नातू  जगतोय असं आयुष्य, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Jun 12, 2024 | 9:53 AM
Share

मल्टी स्टारर ‘बागबान’ सिनेमातील राहुल तुम्हाला सर्वांना आठवत असेलच. सिनेमात राहुल म्हणून भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराने सर्वांच्या मनावर राज्य केलं. आता तोच राहुल मोठा झाला आहे आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत आहे. त्याचं नाव यश पाठक असं आहे. यश आता संगीत विश्वात स्वतःचं करिअर करत आहे. सोशल मीडियावर देखील यश याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. यश याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. यश याला आता पहिल्यानंतर तो खरंच लहानपणीचा राहुल आहे का? यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही.

‘बागबान’ सिनेमात यश याने महानायक अमिताभ बच्चन यांच्या नातवाची भूमिका साकारली होती. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागबान’ सिनेमात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, सलमान खान, समीर सोनी, महिमा चौधरी, दिव्या दत्ता, रिमी सेन यांसारखे अनेक सेलिब्रिटी होती. यश याने सिनेमात बालकलाकारची भूमिका साकारली होती.

View this post on Instagram

A post shared by Yash Pathak (@yashpathak06)

सिनेमात राहुलची भूमिका साकारणारा हा मुलगा आता मोठा झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याचा लुकही इतका बदलला आहे की, त्याला बघून तुम्हाला कदाचित ओळखता येणार नाही. सिनेमाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. रिपोर्टनुसार, 2003 मध्ये सिनेमाने 12 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर जगभरात सिनेमाने 43 कोटींचा गल्ला ओलांडला होता.

यश पाठक याच्याबद्दल सांगायचं झालं तर, यश याने ‘बागबान’ सिनेमाशिवाय अलावा ‘गंगाजल’, ‘राहुल’, ‘परवाना’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण त्याने आता सिनेमामधून ब्रेक घेतला आहे. अभिनयाला राम राम ठोकल्यानंतर यश याने म्यूझिक विश्वात स्वतःचं करियर केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Yash Pathak (@yashpathak06)

यश संगीतकार आणि संगीत निर्माता आहे. यश सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी संपर्कात राहाच असतो. अनेकदा त्याच्या गाण्यांचे अपडेट्स देखील सोशल मीडियावर शेअर करतो. यश याने एआर रहमानसोबत कोक स्टुडिओमध्येही काम केले आहे. यशचे स्वतःचे YouTube चॅनल देखील आहे जिथे तो स्वतःचे संगीत व्हिडिओ शेअर करतो.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.