AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, अमिताभ बच्चन म्हणाले, ‘सर्वकाही बोलून झालंय, आणि….’

Amitabh Bachchan : 'सर्वकाही बोलून झालंय, आणि....', अमिताभ बच्चन यांची हैराण कराणारी पोस्ट, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा...

अभिषेक - ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, अमिताभ बच्चन म्हणाले, 'सर्वकाही बोलून झालंय, आणि....'
| Updated on: Dec 10, 2023 | 12:38 PM
Share

मुंबई | 10 डिसेंबर 2023 : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. घटस्फोटाच्या चर्चा रंगल्यानंतर अनेक ठिकाणी ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत स्पॉट झाली. दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्या पहिल्या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी संपूर्ण बच्चन कुटुंबाला एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण तेव्हा जया बच्चन आणि श्वेता बच्चन – नंदा सतत ऐश्वर्या हिच्याकडे पाठ फिरवताना दिसल्या.. अशी चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगली… एवढंच नाही तर, सिनेमाच्या स्किनिंगनंतर बिग बी यांनी सून ऐश्वर्या हिला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्याची देखील चर्चा रंगली. आता बिग बी यांची एक सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवरुन ऐश्वर्या हिला अनफॉलो केल्याची चर्चा रंगत असताना, बिग बी यांनी एक ट्विट केलं आहे. बिग बी यांच्या एका ट्विटमुळे चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांनी स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अमिताभ बच्चन यांनी लिहिलेल्या कॅप्शनमुळे चाहते देखील हैराण झाले आहेत.

स्वतःचा फोटो पोस्ट करत अमिताभ बच्चन म्हणाले, ‘सर्वकाही बोलून झालं आहे, सर्वकाही करुन देखील झालं आहे…, जे करायचं होतं, ते केलं.. जे केलं ते आता केलं…’, अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. बच्चन कुटुंबत सध्या वाद सुरु असल्यामुळे बिग बी यांनी अशी पोस्ट केली… असं चाहत्यांचं म्हणणं आहे. पण यावर बच्चन कुटुंबातील एकाही सदस्याने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

अमिताभ बच्चन यांच्या इन्स्टाग्रामबद्दल सांगयचं झालं तर, बिग बी इन्स्टाग्रामवर जवळपास 74 लोकांना फॉलो करतात. ज्यामध्ये सलमान खान, अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, विराट कोहली, श्वेता बच्चन नंदा, नव्या नवेली नंदा, प्रियंका चोप्रा, तापसी पन्नू, अहाना कुमरा, कुणाल खेमू, शिल्पा शेट्टी आणि अरमान मलिक यांसारख्या सेलिब्रिटींना फॉलो करतात..

दरम्यान, बिग बी सून ऐश्वर्या राय हिला फॉलो करायचे की नाही? याबद्दल काही कळू शकलं नाही. ऐश्वर्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्या इन्स्टाग्रामवर फक्त एका व्यक्तीला फॉलो करत. ऐश्वर्या इन्स्टाग्रामवर पती आणि अभिनेता अभिषेक बच्चन याला फॉलो करते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?