
मेगास्टार अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या व्हीलॉग्सद्वारे अनेक किस्से सांगतात. पण यावेळी त्यांनी त्यांच्या असहाय्यतेची एक गोष्ट त्यांनी चाहत्यांशी शेअर केली. त्यांच्याकडे असलेल्या पाकिटात जेव्हा एकही रुपया नव्हता.त्यामुळे ते एका मुलीची इच्छा असूनही मदत करू शकले नव्हते. तो प्रसंग आठवला की ते आजही भावूक होतात.
असहाय्यतेला सामोरं जावं लागलं
अमिताभ बच्चन एकदा त्यांच्या कारमधून प्रवास करत असताना त्यांना ज्या असहाय्यतेला सामोरं जावं लागलं त्याबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले की,’मी स्वतःसोबत काही वेळ घालवला… माझ्या पाकिटातील पैसे संपले होते…एक लहान मुलगी गाडीच्या खिडकीजवळ आली आणि मला गजरा विकत घेण्यासाठी आग्रह केला”
मुलीकडे उदास डोळ्यांनी पाहत होतो
पुढे ते म्हणाले “मी माझ्या पाकिटातील सर्व पैसे खर्च केले होते त्यामुळे तिला मदत करता आली नाही… गाडी पुढे सरकली तेव्हा मी त्या लहान मुलीकडे उदास डोळ्यांनी पाहत होतो… जी अजूनही पावसात भिजत उभी होती, आशादायक नजरेने माझ्याकडे पाहत होती, त्यावेळी मला खूप वाईट वाटले… कदाचित त्या पाकिटातील पैशांनी तिच्या जेवणाची व्यवस्था केली असती.”
बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये हा किस्सा शेअर केला आहे.
अमिताभ यांनी या प्रसंगावरून त्यांच्या चाहत्यांना सल्ला दिला की त्यांनी नेहमी त्यांच्या पाकिटात काही पैसे ठेवावेत जेणेकरून ते गरजूंना मदत करू शकतील. ते म्हणाले, “मी त्या मुलीला मदत करू शकलो नाही म्हणून मी खूप अस्वस्थ आहे… या अनुभवातून मी एक धडा शिकलो की आपण नेहमी आपल्या पाकिटात काही पैसे ठेवले पाहिजेत जेणेकरून जेव्हा आपल्याला गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल तेव्हा आपण रिकाम्या हाताने जाऊ नये… एखाद्याच्या आशा तोडणे खूप दुःखद आहे, म्हणून आपण कोणाच्याही आशा तोडू नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”
आजही हा प्रसंग आठवला तरी त्यांना भावूक व्हयला होतं अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर,
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर,अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या नवीन सीझनचे शूटिंग सुरू केले आहे.”हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअर?” या इंग्रजी शोचे हिंदी रूपांतर आहे. अमिताभ बच्चन यांनी जवळजवळ प्रत्येक सीझनमध्ये हा शो होस्ट केला आहे.आताच्या सीझनमध्ये अमिताभ दिसणार नसल्याची चर्चा होती मात्र अखेर तेच हा शो होस्ट करत असल्याची पक्की माहिती समोर आली आहे.