AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ghoomar | ‘जेव्हा स्वतःचा मुलगा…’, अभिषेक बच्चन याने असं काय केलं, ज्यामुळे बिग बींच्या डोळ्यात आलं पाणी

स्वतःची मुलाची झलक पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात पाणी आलं; भावना व्यक्त करत बिग बी म्हणाले, 'जेव्हा स्वतःचा मुलगा...', सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची चर्चा रंगत आहे.

Ghoomar | 'जेव्हा स्वतःचा मुलगा...', अभिषेक बच्चन याने असं काय केलं, ज्यामुळे बिग बींच्या डोळ्यात आलं पाणी
| Updated on: Aug 15, 2023 | 8:31 PM
Share

मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : बच्चन कुटुंबातील सदस्य कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची चर्चा रंगत आहे. आता देखील महानायक अमिताभ बच्चन यांनी मुलासाठी ब्लॉगच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहे. दरम्यान, बिग बी यांच्या डोळ्यात पाणी देखील आलं. तर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, अभिषेक याने असं काय केलं, जे पाहून बिग बी भावुक झाले. तर अभिषेक लवकरच ‘घूमर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. याबद्दल महानायक यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

ब्लॉगमध्ये मुलाचा उल्लेख करत बिग बी म्हणाले, ‘मी घूमर सिनेमा सलग दोन वेळा पाहिला. रविवारी दुपारी आणि रात्री…. जेव्हा तुमचा मुलागा संबंधीत गोष्टीचा भाग असेल तर ते अविश्वसनीय असतं.. तुम्ही स्वतःची नजर देखील हटवू शकत नाही. सिनेमा पाहिल्यानंतर मी माझे विचार तुमच्यासोबत शेअर केल्याशिवाय स्वतःला थांबवू शतक नाही.. माझे डोळे पाणावले आहेत…’

पुढे बिग बी म्हणाले, ‘सिनेमा क्रिकेट खेळाशी निगडीत असून एक मुलगी आणि तिच्या महत्वाकांक्षांवर आधारित कथेवर सिनेमा फिरत आहे. आर बाल्की यांनी अतिशय कठीण मुद्दा सोप्या पद्धतीने आपल्यासमोर मांडला आहे. हारल्यावर काय भावना असतात मला माहिती आहे.. आता जिंकल्यावर विजेत्याच्या भावना कशा असतात हे मला पाहायचं आहे…’

‘आपण प्रत्येकाने अपयशाचा सामना केला आहे. तेव्हा भावना काय असतात आपल्याला माहिती आहेत. पण जेव्हा विजेता यशस्वी होतो. तेव्हा काय भावना असतात… हे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत आपण सर्वजण त्यासाठी लढतो आणि जेव्हा आम्हाला दरवाजा बंद असल्याचं कळतं.. तेव्हा आपण तो तोडतो…’

अभिषेक बच्चन स्टारर ‘घूमर’ सिनेमाला नुकतेच मेलबर्न २०२३ च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळाले आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन व्यतिरिक्त शबाना आझमी आणि अंगद बेदी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘घूमर’ सिनेमा १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!