अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन याच्या कुटुंबातील सर्वात जवळच्या व्यक्तीची प्रकृती खालावली असून त्यांना भोपाळमधील पारुल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते यांची सासू आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांची प्रकृती अचानक खालावली आहे. यामुळे त्यांना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील पारुल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे वय ९५ आहे. इंदिरा भादुरी यांना ॲलर्जीशी संबंधित आरोग्याच्या समस्येमुळे रुग्णालयात भरती करावे लागले आहे. त्यांना हा त्रास अधूनमधून होत असतो. मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा भादुरी यांना ॲलर्जीशी संबंधित त्रास जाणवला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे, वैद्यकीय उपचारानंतर त्यांची प्रकृती आता हळूहळू सुधारत आहे.
सध्या संपूर्ण कुटुंबाच्या नजरा या त्यांच्या आरोग्याकडे लागल्या आहेत. इंदिरा भादुरी यांना रुग्णालयातून सुट्टी कधी मिळणार याबाबतीत अजून कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. डॉक्टर त्यांच्या आरोग्याची आणि रिकव्हरीची स्थिती चेक करूनच डिस्चार्जबद्दल निर्णय घेतील.
कुठे राहतात इंदिरा भादुरी?
इंदिरा भादुरी या भोपाळच्या उच्चभ्रू श्यामला हिल्स परिसरातील अन्सल अपार्टमेंट्समध्ये राहतात. दिवंगत पति तरुण कुमार भादुरी हे ख्यातनाम पत्रकार आणि लेखक होते. इंदिरा भादुरी यांना तीन मुली आहेत. त्यातील जया बच्चन या मोठ्या असून बाकी दोघी लहान बहिणी या भोपाळमधेच राहतात.
भोपळसोबत आहे जुनं नातं
अमिताभ बच्चन यांचं भोपाळशी जुनं खास नातं आहे. नेहमीच खास संबंध राहिला आहे. अनेक महत्त्वाच्या क्षणी बच्चन परिवार भोपाळला जातो. या आधी 2024 मध्ये जेव्हा इंदिरा भादुरी यांची तब्येत खराब झालेली तेव्हा जया बच्चन, अमिताभ आणि अभिषेक बच्चन त्यांना भेटायला भोपाळला गेले होते. याशिवाय फेब्रुवारी 2020 मध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या सासूबाईंचा वाढदिवस साजरा करायलाही भोपळाला गेले होते. त्या खास क्षणी जया बच्चन, अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन सोबत नात आराध्य आणि मुलगी श्वेता बच्चनही सहभागी झालेले.