
Amitabh Bachchan New Property: महानायक अमिताभ बच्चन यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आज बिग बी आणि त्यांच्या कुटुंबियांकडे कोणती गोष्ट नाही असं देखील नाही. अमिताभ बच्चन मुंबईत कुटुंबियांसोबत रॉयल आयुष्य जगतात. मुंबईत अमिताभ बच्चन यांचे अनेक बंगले देखील आहेत. गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी आयोध्या याठिकाणी देखील प्रॉपर्टी खरेदी केली होती. याची चर्चा देखील तुफान रंगली. आता पुन्हा अमिताभ बच्चन यांनी आयोध्या याठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केल्याची चर्चा रंगली आहे.
रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत 25,000 चौरस फूट भूखंड खरेदी केल्याची चर्चा रंगली आहे. भूखंडाची किंमत 40 कोटी रुपये असल्याचं देखील सांगितलं जात आहे. ही जमीन ‘सरयू’ नावाच्या रिअल इस्टेट डेव्हलपमेंटजवळ असल्याचं सांगण्यात येत आहे.
याआधी देखील अमिताभ बच्चन यांनी आयोध्या याठिकाणी गुंतवणूक केली आहे. एवढंच नाही तर, बॉलिवूड निर्माते आनंद पंडिच यांच्या रियर एस्टेट फर्ममध्ये देखील अमिताभ बच्चन यांनी 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रॉपर्टीबद्दल सांगायचं झालं तर, आयोध्येत त्यांनी चार प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत.
सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांच्या चौथ्या प्रॉपर्टीटी चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, चौथ्या प्रॉपर्टीची चर्चा रंगलेली असताना बिग बी यांचं एक ट्विट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ट्विट करत बिग बी म्हणाले, ‘अहहा ! बिना माँगे PR हो गया !!’ सध्या त्याचं ट्विट देखील चर्चेत आहे.
T 5393 – अहहा ! बिना माँगे PR हो गया !!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 28, 2025
याआधी अमिताभ बच्चन यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे पूर्वी त्यांनी 5,372 चौरस फूटाचा भूखंड खरेदी केला होता, ज्याची किंमत 4.45 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली. याशिवाय, बिग बींनी सरयू प्रकल्पात 14.5 कोटी रुपये गुंतवले होते आणि 54,000 चौरस फूटचा भूखंड खरेदी केला होता. अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक स्मारक बांधण्याची योजना आखत आहेत अशा देखील माहिती समोर आलेली.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आता बिग बी ‘रामायण: पार्ट 1’ मध्ये मुख्य भूमिका बजावताना दिसणार आहेत. ज्यामध्ये अमिताभ बच्चन जटायूच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. चाहते देखील अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत.