
अमिताभ बच्चन म्हटलं की बॉलिवूडमधील सगळ्यात मोठं नाव. अभिनयासाठी देखील आणि घराणं म्हणून देखील बच्चन फॅमिलीकडे फार आदराने पाहिलं जातं. पण फक्त घराणंच नाही तर अमिताभ बच्चन यांच्याकडे असणाऱ्या प्रॉपर्टीची देखील तेवढीच चर्चा होत असते. अमिताभ बच्चन यांच्याकडे कोट्यावधी रुपयांचे बंगले आहेत. जर या बंगल्यांची किंमत जोडली तर त्यांची एकट्याची मालमत्ता सुमारे 1000 कोटी रुपयांची आहे. अमिताभ बच्चन यांचे कोट्यवधींचे बंगले असल्याचं म्हटलं जातं.

दिल्लीतील सोपान :अमिताभ बच्चन हे त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांच्यासोबत दिल्लीतील सोपान बंगल्यात राहत होते. हा बंगला दिल्लीतील सर्वात पॉश भागात असलेल्या गुलमोहर पार्कमध्ये आहे. हा बच्चन कुटुंबाचा पहिला बंगला होता जो त्यांची आई तेजी बच्चन यांच्या नावावर होता. त्यांचे वडील 1980 पर्यंत येथे त्यांच्या सभा घेत असत. आईच्या निधनानंतर त्यांनी 2021 मध्ये हा बंगला 23 कोटी रुपयांना विकला.

प्रतीक्षा: दिल्लीनंतर, मुंबईत अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेला पहिला बंगला 'प्रतिक्षा'. 'जंजीर' चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी हा बंगला 8 लाखांना खरेदी केला. बच्चन कुटुंबाच्या संस्मरणीय होळीच्या पार्ट्या याच घरात झाल्या आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे लग्नही याच बंगल्यात झाले.

जलसा: जलसा हा तो बंगला आहे जिथे अमिताभ बच्चन त्यांच्या कुटुंबासह राहतात. 1982 मध्ये 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटाच्या यशानंतर रमेश सिप्पी यांनी हा बंगला त्यांना भेट दिल्याचं वृत्त आहे. या बंगल्याची किंमत एका वर्षापूर्वी 112 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते

जनक: जलसा पासून सुमारे 50 पावलांवर अमिताभ बच्चन यांचा 'जनक' नावाचा आणखी एक बंगला आहे. हा बंगला अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांचे ऑफिस आहे. चित्रपटाशी संबंधित सर्व बैठका इथेच होतात. अभिनेत्याने हा बंगला 8 कोटींना खरेदी केला होता. आता त्याची किंमत नक्कीच त्यापेक्षा जास्त असेल.

वत्स: जलसा आणि जनक यांचा वत्स नावाचा आणखी एक बंगला आहे. अभिनेत्याने हा बंगला 5 कोटी रुपयांना खरेदी केला होता. सध्या हा बंगला बँकेला भाड्याने देण्यात आला आहे.

आशियाना: बंगल्यांव्यतिरिक्त, अमिताभ बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी मुंबईतील अंधेरी येथील एटलांटिस नावाच्या एका आलिशान इमारतीच्या 27 व्या आणि 28 व्या मजल्यावर 31 कोटी रुपयांना एक डुप्लेक्स खरेदी केले होते. या घराचे नाव आशियाना ठेवण्यात आले होते. यासोबतच 6 कार पार्किंगची सुविधा देखील देण्यात आली आहे.

प्रयागराज (अलाहाबाद) येथील वडिलोपार्जित घर: याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या नावावर अलाहाबादमध्ये वडिलोपार्जित मालमत्ता देखील आहे. तिथे देखील एक आलिशान घर आहे ज्याचं नाव आहे प्रयागराज.

फ्रान्समधील घर: रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांचा फ्रान्समध्येही एक बंगला आहे. तथापि, या घराबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही.