AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन झाले अलिबागकर! विराट कोहलीचे बनले शेजारी, वाढदिवशी स्वत:लाच दिली 65900000 रुपयांची भेट

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चनसुद्धा आता अलिबागकर झाले आहेत. क्रिकेटर विराट कोहलीचे ते शेजारी बनले आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांनी अलिबागमध्ये तीन भूखंड खरेदी केले आहेत.

अमिताभ बच्चन झाले अलिबागकर! विराट कोहलीचे बनले शेजारी, वाढदिवशी स्वत:लाच दिली 65900000 रुपयांची भेट
Amitabh BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 14, 2025 | 8:37 AM
Share

शाहरुख खान. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, विराट कोहली यांच्यापाठोपाठ आता बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हेसुद्धा अलिबागकर झाले आहेत. त्यांनी अलिबागच्या मुनवली इथं सहा कोटी रुपयांना तीन विकसित भूखंड खरेदी केले आहेत. पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जाणारं अलिबाह गेल्या काही वर्षांत प्रमुख गुंतवणूक केंद्र झालं आहे. देशातील बडे उद्योजक, कलावंत आणि क्रिकेटपटू यांनाही अलिबागमध्ये गुंतवणुकीचा मोह आवरता आलेला नाही. शाहरुख खान, अक्षय खन्ना, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, विराट कोहली, अनुष्का शर्मा, राम कपूर, क्रिती सनॉन यांच्या पाठोपाठ आता बिग बींनीही अलिबागमध्ये विकसित भूखंड खरेदी केले आहेत.

अलिबाग तालुक्यातील मुनवली इथं त्यांनी 8 हजार 880 चौरस फुटांचे तीन विकसित भूखंड खरेदी केले आहेत. ज्याचं बाजारमूल्य 6 कोटी 59 लाख रुपये आहे. नुकतीच या खरेदी व्यवहाराची अलिबाग इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यासाठी 39 लाख 58 हजार रुपयांचा मुद्रांक शुल्क आणि 90 हजार रुपये नोंदणी शुल्क भरलं आहे. अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेल्या भूखंडामध्ये 3 हजार 760 चौरस फूट, 2 हजार 580 चौरस फूट आणि 2 हजार 540 चौरस फूट अशा तीन भूखंडांचा समावेश आहे.

अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपला 83 वा वाढदिवस साजरा केला. दर रविवारी त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते ‘जलसा’ बंगल्याबाहेर जमा होतात. वाढदिवशी ही गर्दी आणखी वाढते. बिग बींनीही बंगल्याबाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केलं आणि त्यांना भेटवस्तू वाटल्या. वयाची ऐंशी पार केल्यानंतरही बिग बी सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. टेलिव्हिजनपासून मोठ्या पडद्यापर्यंत ते विविध प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या शोचे ते सूत्रसंचालक आहेत. केबीसीच्या सेटवर खास पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जावेद अख्तर आणि फरहान अख्तर यांनी त्यांचा वाढदिवस आणखी खास बनवला. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ते रजनीकांत यांच्यासोबत ‘वेट्टाय्यान’ या दाक्षिणात्य चित्रपटात झळकले होते. यानंतर ते ‘कल्की 2898 एडी’च्या सीक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.