मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची श्रीमंती जगजाहीर आहे. आज त्यांच्याकडे आलिशान बंगले, गाड्या आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मात्र एक काळ असा होता जेव्हा ते छोट्याशा खोलीत आठ जणांसोबत राहायचे. त्यावेळी त्यांचा पगार फक्त 1640 रुपये इतका होता. याचा खुलासा खुद्द बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये केला. बिग बी विविध विषयांवर ब्लॉग लिहित त्यात आपल्या भावना व्यक्त करतात तर कधी जुने किस्से सांगतात. नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांनी संघर्षाच्या दिवसांना उजाळा दिला आहे.