अमिताभ बच्चन यांच्या पायाची नस कापली गेली, पडले टाके; आता कशी आहे तब्येत?

केबीसीच्या सेटवर बिग बींच्या पायाला दुखापत, नेमकं काय घडलं?

अमिताभ बच्चन यांच्या पायाची नस कापली गेली, पडले टाके; आता कशी आहे तब्येत?
Amitabh Bachchan
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 23, 2022 | 1:59 PM

मुंबई- ‘कौन बनेगा करोडपती 14’च्या (KBC 14) सेटवर सूत्रसंचालक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत नुकतीच एक दुर्घटना घडली. बिग बींच्या पायाची नस कापली गेली आणि त्यामुळे त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करावं लागलं. अमिताभ बच्चन यांनी स्वत: या गोष्टीचा खुलासा केला. आपल्या ब्लॉगमध्ये बिग बींनी या घटनेबद्दल लिहिलं आहे. सेटवर पायाची नस कापली गेल्याने बिग बींना जवळच्या रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मात्र आता त्यांची प्रकृती ठीक असून चिंतेचं काही कारण नाही.

दुखापत झाल्यानंतर बिग बींच्या पायाला टाके लागले. आता त्यांची तब्येत पूर्णपणे ठीक आहे. त्यामुळे चाहत्यांनी चिंता करू नये, असं त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटलंय. सेटवर त्यांच्या पायाला दुखापत कशी झाली, याविषयीसुद्धा त्यांनी सांगितलं.

पायाला दुखापत कशी झाली?

सेटवर धातूच्या एका धारदार वस्तूमुळे पायाच्या मागच्या बाजूला दुखापत झाल्याचं बिग बींनी सांगितलं. रक्तस्राव होऊ लागल्याने त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या पायाला टाके मारण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे दुखापतग्रस्त पायावर जोर न देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

पायाची जखम बरी होईपर्यंत ट्रेडमिलवर चालू नका, असंही डॉक्टरांनी बिग बींना सांगितलं आहे. केबीसीच्या सेटवर आपली खूप काळजी घेतली जाते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अमिताभ बच्चन यांनी नुकताच आपला 80 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त केबीसीकडून खास एपिसोडचं आयोजन करण्यात आलं होतं. या एपिसोडमध्ये बिग बींची पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनीसुद्धा सहभाग घेतला होता.